Ashok Mama: 'अशोक मा.मा.' मालिकेत ट्विस्ट, अशोक मामांच्या विरोधात भैरवीचा नवा डाव

Ashok Mama Serial Update : 'अशोक मा.मा.' मालिका दिवसेंदिवस अधिक मनोरंजक होत जात आहे. या मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
Ashok Mama Serial Update
Ashok MamaSAAM TV
Published On

'अशोक मा.मा.' (Ashok Mama) मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत सध्या अशोक मा.मा. नोकरी मिळविण्यासाठीची धडपड सुरू आहे. नोकरीसाठी सुरू असलेली ही वणवण कधी संपणार याचीच प्रतीक्षा आहे. तर दुसरीकडे अशोक मामांच्या विरोधात भैरवी नवा डाव आखते आहे. भैरवीला कळत की इरा आणि ईशान सोसायटीमध्ये पुस्तके विकत होती आणि ह्यावरूनच तिचा तिळपापड होतो आणि ती तिच्या बाबांना गळ घालते की तिला मुलांना आणण्यासाठी मदत करा.

भैरवी घरी जाते सांगते की, ती मुलांना घेऊन जाणार. मामा त्याला सहमती दर्शवतात. इरा आणि ईशान मात्र मा.मा सोबत राहतात आणि संयमी भैरवी सोबत तिच्याकडे जाते. पण, भैरवीला मात्र इरा आणि ईशानची देखील कस्टडी हवी आहे आणि त्यामुळेच ती अनिशला लग्नासाठीची विचारणा करते. आता अनिश भैरवीशी लग्नासाठी तयार होईल का? भैरवी मुलांची कस्टडी मिळवू शकेल का? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

भैरवीवर अशोक मा. मांना बऱ्याचदा संशय देखील येतो. की, नक्की हीच डाव काय असणार आहे? कारण याआधी मुलांची कस्टडी मिळविण्यासाठी भैरवीने अनेक प्रयत्न केले आहेत. संयमी भैरवीकडे आहे आणि इरा ईशान मामांकडे. एकमेकांपासून दुरावल्याने तिघांनाही एकमेकांची आठवण येते आहे. इरा मामांना मोबाईल वर व्हिडिओ कसा करायचा ते शिकवते आणि मामा संयमीला घरी परत ये असा व्हिडिओ पाठवतात. त्यांचा व्हिडिओ बघून संयमी घरी परत येते.

भैरवी आता दुसरा प्लान करायचे ठरवते. त्यासाठी वकिलांना जाऊन भेटते. भैरवी अनिशला भेटते आणि सांगते की मामांच्या विरोधात मुलांना आणण्यासाठी मला मदत कर. दुसरीकडे, मामा अजूनही नोकरी शोधत आहेत. घरी परतल्यावर अशोक मा. मा मुलांसोबत छान रमले पाहायला मिळत आहेत. मामा मुलांचे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यात छान बॉण्डिंग पाहायला मिळत आहे. 'अशोक मा.मा' ही मालिका रात्री ८.३० वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळते.

Ashok Mama Serial Update
Chhaava Box Office Collection : 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी! फक्त ३ दिवसातच १०० कोटींचा टप्पा पार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com