
पालकांनो, तुमची मुलं काय करतायत याकडे लक्ष द्या. कारण, सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतोय. त्यामध्ये असा दावा करण्यात आलाय की शाळेतील मुलांना चॉकलेट ड्रग्ज विकलं जातंय. खरंच शाळेच्या आवारात ड्रग्ज विकणारे फिरतायत का? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात. सावधान. तुमची मुलं शाळेत काय खातात...? त्यांना काही कुणी खायला देतंय का? य़ावर लक्ष ठेवा.
कारण, स्ट्रॉबेरी क्विक नावाने कँडी दिली जातेय. मात्र, ती कँडी नसून, ड्रग्ज असल्याचा दावा करण्यात आलाय. हा दावा केल्यानं पालकांसह शिक्षकांचीही झोप उडालीय. खरंच शाळेच्या आवारात ड्रग्ज विकलं जातंय का? हा विषय मुलांच्या आरोग्याचा आहे. त्यामुळे पडताळणी करणं गरजेचं आहे...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.
तुमच्या मुलांना अनोळखी व्यक्तींकडून कँडी न स्वीकारण्याची सूचना द्या. त्याचा वास स्ट्रॉबेरीसारखा आहे मात्र शाळेच्या आवारात कँडीच्या नावाने ड्रग्ज दिलं जातंय. हा दावा गंभीर आहे. अजून तरी शाळेच्या आवारात स्ट्रॉबेरी क्विक ड्रग्ज विकत असल्याचं आढळलेलं नाही. मात्र, खरंच असं शाळेच्या आवारात ड्रग्ज विकलं जातंय का? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी केली. याबाबत पोलीस माहिती देऊ शकतात. त्यामुळे आमचे प्रतिनिधी पोलीस अधिकाऱ्यांना भेटले. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.
शाळांमध्ये स्ट्रॉबेरी क्विक नावाचं ड्रग्ज आढळलेलं नाही
शिक्षकांनी,पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये
कोणतीही अशी गोष्ट आढळली तर तक्रार करावी
स्ट्रॉबेरी क्विक ड्रग्ज 2007 साली अमेरिकेत जप्त केलं होतं
आपल्या महाराष्ट्रात शाळांमध्ये ड्रग्ज आढळलेलं नाही
सध्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यातच पालक, शिक्षक आणि मुलांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी असे मेसेज आणि फोटो व्हायरल केले जातात.त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका.आमच्या पडताळणीत शाळांच्या आवारात चॉकलेट ड्रग्ज विकलं जात असल्याचा दावा असत्य ठरलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.