Akshay Kumar: ईदला सलमान खानसह अक्षय कुमार देणार चाहत्यांना मोठं सरप्राईज; या १८ सिलिब्रिटींसोबत येणार भेटीला

salman khan sikandar Movie: भाईजानचा सिकंदर ईदला प्रदर्शित होणार आहे. सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाचे चित्रीकरण जवळजवळ पूर्ण झाले आहे. दरम्यान, 'सिकंदर' सोबतच अक्षय कुमारही चाहत्यांना मोठं सरप्राईज देणार आहे.
Salman Khan Akshay Kumar
Salman Khan Akshay KumarSaam tv
Published On

Salman Khan Sikandar Movie : सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट ईदला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. चित्राचे काम अद्याप पूर्ण झाले नसले तरी ते लवकरच पूर्ण होईल. सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांचा हा चित्रपट आर मुरुगादोस दिग्दर्शित करत आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवालाने केली आहेत. आता सलमान खानच्या चित्रपटाच्या निर्मात्याने अक्षय कुमारच्या चित्रपटासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

खरंतर, अक्षय कुमारचा 'हाऊसफुल ५' हा चित्रपट जूनमध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहे. अक्षय कुमार व्यतिरिक्त या चित्रपटात रितेश देशमुख, संजय दत्त, फरदीन खान, नाना पाटेकर, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ आणि दिनो मोरिया यांच्या भूमिका आहेत. त्याच वेळी, अभिनेत्रींच्या नावांमध्ये जॅकलिन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, सोनम बाजवा, चित्रांगदा आणि सौंदर्या शर्मा यांचा समावेश आहे. दरम्यान, 'हाऊसफुल ५' या चित्राचा ट्रेलर 'सिकंदर' सोबत जोडला जाणार असल्याचे समोर आले.

Salman Khan Akshay Kumar
Sarang Sathye: रणवीर अलाहबादीया प्रकरणामुळे सारंग साठ्येचा 'अतिशय निर्लज्ज कांदेपोहे शो' गोत्यात; मनसेकडून शो बंदीचा इशारा

'सिकंदर' सोबत 'हाऊसफुल ५' चा ट्रेलर

अलीकडेच पिंकव्हिलावर एक अहवाल प्रकाशित झाला. यावरून असे समोर आले की साजिद नाडियाडवाला अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल ५' चा ट्रेलर 'सिकंदर' सोबत जोडत आहेत. म्हणजेच निर्माते मार्चमध्येच त्याचा ट्रेलर प्रदर्शित करतील. खरंतर हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या कॉमिक फ्रँचायझींपैकी एक आहे. यावेळी या चित्रपटाचा पाचवा भाग येत आहे.

Salman Khan Akshay Kumar
Arjun Kapoor : मालयकाच्या पुन्हा एकदा प्रेमात अर्जुन कपूर? म्हणाला, 'मी तिला पाहून नेहमी अवाक...'

निर्माते त्यांच्या प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांसोबत इतर चित्रांचे ट्रेलर आणि टीझर जोडतात. अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल ५' ची पटकथा खूपच वेगळी आहे. या वर्षी साजिद नाडियाडवाला अनेक चित्रपटांवर काम करत आहेत. सलमान खानच्या 'सिकंदर' व्यतिरिक्त, त्यात अक्षय कुमारचा 'हाऊसफुल ५' देखील समाविष्ट आहे. दुसरीकडे, टायगर श्रॉफचा 'बागी ४' देखील या यादीत आहे. ज्या चित्रपटाकडून त्याला सर्वात जास्त अपेक्षा असतील तो म्हणजे सलमान खानचा सिकंदर. चित्रपट चांगला व्यवसाय करू शकेल यासाठी ईदला चित्रपट प्रदर्शित करण्याची रणनीती अवलंबण्यात आली आहे. अक्षय कुमारच्या चित्रपटाची चर्चा निर्माण करण्यासाठी, सलमान खानच्या चित्रपटासह 'हाऊसफुल ५'चा ट्रेलर रिलीज केला जात आहे. चाहते त्या दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहून आनंदी होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com