
Sarang Sathye: महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर समय रैनाच्या इंडियास गॉट लेटेंट शोमधील रणवीर अलाहाबादीयाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. शोमध्ये केलेल्या पालकांविषयीच्या अपमानास्पद वक्तव्यामुळे रणवीरला ट्रॉलिंगचा सामान करावा लागत आहे. आता याचे पडसाद भारतीय डिजिटल पार्टी या सारंग साठ्येच्या यूट्यूब चॅनल 'अतिशय निर्लज्ज कांदेपोहे शो'वर उमठत आहे.
रणवीर अलाहाबादीयाच्या प्रकारानंतर आता सारंग साठ्येच्या अतिशय निर्लज्ज शो चर्चेत आहे. मनसे चित्रपट सेनेच्या निशाण्यावर सारंग साठेचा अतिशय निर्लज्ज शो आला असून या शोबद्दल मनसेचे कार्यकते आक्रमक झाले आहेत. या शोमध्ये देखील अनेक अपमानास्पद विनोदामुळे मनसे स्टाइल पुण्यातील शो बंद पडणार असल्याचा इशारा मनसे चित्रपट सेनेचे पुणे अध्यक्ष चेतन धोत्रे यांनी दिला आहे.
या संदर्भात एक फेसबुक पोस्ट करत मनसे चित्रपट सेनेने सारंग साठ्येच्या अतिशय निर्लज्ज शोला विरोध दर्शवला आहे. शारिरीक गोष्टींवर अपमानास्पद कॉमेडी करत मराठी माणसाची मान शरमेने खाली घालणारा सारंग साठे आहे. त्याचा थारा लागू देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मनसे चित्रपट सेनेने मांडली आहे.
रणवीर अलाहबादिया आणि सारंग साठे सारखेच !
रणवीर अलाहबादिया हा असं वक्तव्य करेल हे कोणालाही वाटलं नव्हतं. मात्र त्याच्या वक्तव्याने अनेकांची मान शरमेने खाली गेली. तसेच काहीसे आपल्या मराठीतील कलाकारांचे मराठी संस्कृतीचे ऑनलाइन धडे देणारे ‘भाडिपा’ (YouTube Channel) यांचा देखील थिल्लर चाळे चालणारा ‘अतिशय निर्लज्ज’ नावाचा शो मराठी माणसाच्या विचारसरणीला आणि अस्मितेला न शोभणारा आहे.
या चॅनेलकडून अनेकदा स्वतःचा TRP वाढवण्याकरिता आपली संस्कृतीमूल्य, कुटुंबसंस्था यांचं वेळोवेळी अवमूल्यन होतंच असतं , हे असे आगावूपणे बोलणे बास झालं आता. ही कीड आता सगळीकडे पसरत चालली आहे परंतु आता पुण्यात हे होऊन दिलं जाणार नाही. त्यांनी लोकांची चांगल्या पद्धतीने करमणूक करावी त्याला मनसे चित्रपट सेना नेहमी साथ देईल. परंतु या बाकीच्या भानगडीत पडू नये."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.