Ajay Devgn: विकी कौशलच्या 'छावा'मध्ये अजय देवगणची एन्ट्री; साकारणार 'ही' महत्वाची भूमिका

Chhaava Movie : विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या 'छावा' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
chhaava Ajay Devgn
chhaava Ajay DevgnGoogle
Published On

Ajay Devgn: विकी कौशलच्या 'छावा' चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. हा चित्रपट उद्या म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. तर रश्मिका मंदान्ना त्यांची पत्नी येसूबाईंची भूमिका साकारत आहे. सध्या दोघेही कलाकार प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगवरून असे दिसते की हा चित्रपट खूप हिट होणार आहे. दरम्यान, या चित्रपटामध्ये अजय देवगणची एंट्री झाली. या चित्रपटाच्या निमित्ताने अजय एक विशेष भूमिका पार पडणार आहे.

अलीकडेच पिंकव्हिला कडून एक रिपोर्ट समोर आला आहे. त्यातून असे समोर आले आहे की अजय देवगण चित्रपटात व्हॉइस ओव्हर करणार आहे. त्याने त्याच्या भागाचे डबिंग देखील पूर्ण केले आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्माते दिनेश विजान यांनी यावर सहमती दर्शवली.

chhaava Ajay Devgn
Ranveer Allahbadia: 'मी माझ्या आईवर प्रेम करतो, पण...'; रणवीर अलाहाबादिया नाही परफेक्ट मुलगा, केले स्वतः कबूल!

'छावा' मध्ये अजय देवगण काय करतोय?

विकी कौशलच्या 'छावा' मध्ये प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्यात आली आहे. हा चित्रपट मराठा योद्धा छत्रपती संभाजी आहे. त्यामुळे आवाजही तितकाच दमदार असायला हवा. विकी कौशलच्या चित्रपटाचा ट्रेलर अप्रतिम होता. दरम्यान, अजय देवगण देखील चित्रात आवाज देत आहे. अजय देवगण हा भारतीय चित्रपटसृष्टीतील अशा स्टार्सपैकी एक आहे, जो आपल्या आवाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो आणि त्यांची मने जिंकतो.

chhaava Ajay Devgn
Naga Chaitanya Thandel Movie: नागा चैतन्यची १६ वर्षांनंतर होणार १०० कोटी क्लबमध्ये एंट्री? 'थंडेल'मुळे चमकणार अभिनेत्याचे नशिब

अजय देवगणचे काम पूर्ण झाले

माहितीनुसार, अजयने गेल्या आठवड्यात व्हॉइस डबिंग पूर्ण केली आहे. यावेळी, अजय देवगण देखील त्याच्या आगामी चित्रपटांची तयारी करत आहे. गेल्या वर्षी त्यांचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले, पण 'शैतान' वगळता त्यांचे कोणतेही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com