Naga Chaitanya Thandel Movie: नागा चैतन्यची १६ वर्षांनंतर होणार १०० कोटी क्लबमध्ये एंट्री? 'थंडेल'मुळे चमकणार अभिनेत्याचे नशिब

Thandel box office collection : साऊथ चित्रपट 'थंडेल' सध्या थिएटरमध्ये सुरू आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन ४ दिवस झाले आहेत आणि या ४ दिवसांतच चित्रपटाने जगभरातील कलेक्शनच्या बाबतीत १०० कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे.
Naga Chaitanya Thandel Movie
Naga Chaitanya Thandel MovieGoogle
Published On

Naga Chaitanya Thandel Movie: वैयक्तिक आयुष्यात एक नवीन आयाम सुरू केल्यानंतर, दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आता व्यावसायिक आघाडीवरही सक्रिय झाला आहे. शोभिता धुलिपालाशी लग्न झाल्यानंतर प्रदर्शित झालेला थंडेल हा नागा चैतन्यचा पहिला चित्रपट आहे. यामध्ये तो साई पल्लवीसोबत काम करताना दिसत आहे. चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनचे चार दिवसांचे आकडे बाहेर आले आहेत. हा चित्रपट हिंदी प्रेक्षकांमध्ये तितका लोकप्रिय नसला तरी भारतातील इतर भाषांमध्ये तो चांगला कमाई करत आहे. याशिवाय, हा चित्रपट परदेशातही चांगली कमाई करत आहे. चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनचे चार दिवसांचे आकडे बाहेर आले आहेत.

थंडेलने ४ दिवसांत किती कमाई केली?

'थंडेल'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाच्या एक्स हँडलनुसार, चित्रपट प्रदर्शित होऊन ४ दिवस झाले आहेत आणि या ४ दिवसांत चित्रपटाने ७३.२० कोटी रुपये कमावले आहेत. हा चित्रपट १०० कोटी रुपयांच्या कमाईकडे वेगाने वाटचाल करत आहे. या चित्रपटाने अवघ्या ४ दिवसांत इतकी कमाई केली आहे की आजपर्यंत नागा चैतन्यचा कोणताही चित्रपट एवढी कमाई करू शकलेला नाही.

Naga Chaitanya Thandel Movie
Ranveer Allahbadia: 'मी माझ्या आईवर प्रेम करतो, पण...'; रणवीर अलाहाबादिया नाही परफेक्ट मुलगा, केले स्वतः कबूल!

कारकिर्दीत अनेक सुपरहिट-ब्लॉकबस्टर दिले

नागा चैतन्य यांनी त्यांच्या १६ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण त्याचा एकही चित्रपट ७० कोटींच्या वर जाऊ शकला नाही. 'माजिली' हा नागा चैतन्यच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट आहे. २५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने ६७ कोटी रुपये कमावले. याशिवाय, त्याच्या 'मनम' चित्रपटानेही ३० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये ६७ कोटी रुपये कमावले. याशिवाय तो आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा चित्रपटाचाही भाग होता.

Naga Chaitanya Thandel Movie
samay raina: समय रैना इंडियाज गॉट लेटेंटच्या एका एपिसोडचे किती मानधन घेतो?

१०० कोटी रुपयांचा कमाई १६ वर्षांनंतर होईल का ?

नागा चैतन्यच्या १६ वर्षांच्या कारकिर्दीत आतापर्यंत त्याच्या एकाही चित्रपटाला १०० कोटी रुपयांची कमाई करू शकला नाही. पण आता हे काम या चित्रपटासाठी फारसे कठीण वाटत नाही. चित्रपट ज्या पद्धतीने कमाई करत आहे त्यावरून हे स्पष्ट होते की येत्या २-३ दिवसांत हा चित्रपट सहजपणे १०० कोटी रुपये कमवू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com