Arjun Kapoor : मालयकाच्या पुन्हा एकदा प्रेमात अर्जुन कपूर? म्हणाला, 'मी तिला पाहून नेहमी अवाक...'

Arjun Kapoor And Malaika Arora : अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप झाले आहे. पण आजही दोघांमध्ये चांगले नाते आहे. दोघांमध्ये एकमेकांबद्दल कटुता नाही.
Arjun Kapoor And Malaika Arora
Arjun Kapoor And Malaika AroraSaam Tv
Published On

Arjun Kapoor : अर्जुन कपूरचा 'मेरे हसबंड की बीवी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. अर्जुन चित्रपटाचे जोमाने प्रमोशन करत आहे. आता तो इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर या शोमध्ये सहभागी झाला आहे. या शोमध्ये मलायका अरोरा जज आहे. शो दरम्यान, स्पर्धक मलायकाला स्टेजवर घेऊन जातात आणि ती तिच्या नृत्यशैलीने सर्वांना आश्चर्यचकित करते.

मलायकाचे कौतुक करताना अर्जुन म्हणतो, मी अनेक वर्षांपासून तिला पाहून नेहमी अवाक होतो.मी अजूनही गप्पच आहे. पण मी एवढेच सांगू इच्छितो की माझ्या आवडत गाणं इथे सादर झालं आणि त्यावर मलायकाचा सुंदर असा डान्स पाहायला मिळाला त्यामुळे मी खूप खुश आहे.

Arjun Kapoor And Malaika Arora
Ranragini Tararani: महाराष्ट्राच्या गौरवशाली शिवइतिहासातील महत्वाचे पान उलघडणार; ‘रणरागिणी ताराराणी’ नाटक लवकरच रंगभूमीवर!

अर्जुन पुढे म्हणतो, ज्या प्रकारचे या डान्सचे सादरीकरण झाले ते मनाला भिडणारे होते. अभिनंदन मलायका, तुला माहिती आहे मला ही गाणी किती आवडतात. त्यामुळे मी फार एन्जॉय केलं. यावर प्रतिउत्तर देत मलायका म्हणते खूप खूप धन्यवाद.

Arjun Kapoor And Malaika Arora
Sarang Sathye: रणवीर अलाहबादीया प्रकरणामुळे सारंग साठ्येचा 'अतिशय निर्लज्ज कांदेपोहे शो' गोत्यात; मनसेकडून शो बंदीचा इशारा

ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या नात्याबद्दल सर्वजण त्यांचे कौतुक करत आहेत. लवकरच अर्जुनाचा 'मेरे हसबंड की बीवी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रकुल प्रीत सिंग आणि भूमी पेडणेकरची महत्वाची भूमिका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com