'आई तुळजाभवानी' या मालिकेने महाराष्ट्रातील लोकांच्या मनात अल्पावधीतच एक अढळ स्थान निर्माण केले आहे महाराष्ट्रातून वाढता प्रतिसाद आणि प्रेक्षक मायबाप आशीर्वादामुळे आज मालिकेने आपले 100 यशस्वी भाग पूर्ण केलेत. अनेक असुरांचा संहार करत वेळोवेळी भक्तांचे रक्षण देवीने कसे केले, महिषासुर आणि देवीचे चाललेल प्रदीर्घ काळ युद्ध नेमके कसे लढले गेले. दैत्यमाता दीतीची महत्वाकांक्षा नेमकी काय होती, ही आजवर माहीत नसलेली गोष्ट उलगडणार आहे. तसेच देवीला पृथ्वीतलावर साथ देणारे महादेव आणि पृथ्वीवर भक्त कल्याणात रममाण झालेली तुळजारुपातली पार्वती माता यांचे पतीपत्नीचे गोड गंमतीदार नातेही पाहायला मिळत आहे.
कधीच आई होऊ शकणार नाही हा देवी पार्वतींना असलेला शाप, ते त्यांचा 'जगदजननी' जगन्माता हा सगळ्या विश्वाचे आईपण जपणारा प्रवास प्रत्यक्ष महादेवांना ही भावनिक करणारा होता. या शापाची आणि आईपणाची ही फारशी माहीत नसलेली मायेची गोष्ट या महागाथेची उत्सुकता वाढवणारी आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ची कधी ना पाहिलेली महागाथा प्रेक्षकांची माने जिंकत आहे. आई तुळजाभवानी मालिकेत तुळजाभवानीच्या रूपात दिसत आहे अभिनेत्री पूजा काळे आणि महादेवाच्या रूपात आहे अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र.
मालिकेचे कोल्हापूरमध्ये गेले पाच ते सहा महिने ही मालिका चित्रनगरीमध्ये शूटिंग करत आहोत. या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानी देवीची गाथा प्रेक्षकांसमोर उलगडण्यात आली आहे अशीच या माध्यमातून आई तुळजाभवानीची सेवा आमच्याकडून घडत राहो अशी इच्छा मालिकेची निर्माते आणि दिग्दर्शक शशांक शेंडे यांनी व्यक्त केली.
अभिनेत्री पूजा काळे म्हणाली की, "मला ही भूमिका मिळाली हे माझं भाग्यच आहे .माझ्या ध्यानीमनी नव्हते ,मी कथक डान्सर असल्याने माझे काही सोशल मीडियावर चे व्हिडिओ संबंधित लोकांनी पाहिल्यावर मला मेसेज आला आणि या भूमिकेविषयी विचारले तेव्हा भेटल्यावर त्यांना मी स्पष्ट बोलले की माझा अभिनय प्रांत नाही आहे नाहीये तर हे कसे मी निभावू शकते ? त्यांनी एक विश्वास दिला की तुम्ही करू शकता आणि काही सराव केल्यानंतर ह्या गोष्टी जमल्याने आज तुमच्या समोर उभी आहे .मला विश्वास बसत नाही की मी ही भूमिका करते बहुदा आई तुळजाभवानीच्या मनात असेल की ही माझ्याकडून सेवा घडावी." ही मालिका रोज रात्री नऊ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर लोकांच्या भेटीस येत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.