Chhaava Movie Release Date : अखेर ठरलं! 'छावा' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित; विकी कौशल म्हणाला- ३४४ वर्षांनंतर…

Vicky Kaushal Movie : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'छावा' आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. चित्रपटाचे सर्व अपडेट जाणून घ्या.
Vicky Kaushal Movie
Chhaava Movie Release DateSAAM TV
Published On

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल कायमच आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घालतो. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत विकीचा चाहता वर्ग आहे. तो कोणतीही भूमिका सुरेख हाताळतो. चाहते नेहमीच त्याच्या चित्रपटाची वाट पाहत असतात. आता विकी कौशल (Vicky Kaushal ) लवकरच 'छावा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अखेर विकी कौशलच्या 'छावा' (Chhaava) चित्रपटाच्या प्रदर्शिनाची तारीख ठरली आहे. त्याने चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करून ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटातून विकी एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात येणार आहे.

विकी कौशल पहिल्यांदाच एका ऐतिहासिक भूमिकेत पाहायला मिळणार आहे. विकीने पोस्ट करून चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज आणि चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. विकीने पोस्टमध्ये लिहिलं की, "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 16 जानेवारी 1681 रोजी पार पडला होता. या दिनाचं औचित्य साधत आज बरोबर 344 वर्षांनंतर आम्ही महाराजांची यशोगाथा मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी सज्ज झालो आहोत. 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर 22 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे."

ट्रेलर रिलीज सोबतच विकी कौशलने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे. बहुप्रतीक्षित 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारी 2025ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकी कौशलसोबत या चित्रपटात साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील पाहायला मिळणार आहे. छावा चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे.

Vicky Kaushal Movie
Kareena on Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर करीनाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com