'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' (Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj) हा चित्रपट 22 नोव्हेंबरला रिलीज झाला. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता ठाकुर अनूपसिंग आहे. त्याच्या दमदार अभिनयाने चित्रपट गाजत आहे.
"धर्मरक्षक संभाजी महाराज चित्रपटाचा शो लावला नाही, तर चित्रपटगृहाची एकही काच शिल्लक राहणार नाही..." असा सज्जड दम मनसेने उल्हासनगरच्या मिराज अशोक अनिल चित्रपटगृहाला दिला आहे. या चित्रपटगृहाने धर्मरक्षक संभाजी महाराज चित्रपटाचा एकही शो न लावल्यामुळे मनसेने चित्रपटगृहाबाहेर निदर्शने करत व्यवस्थापकांना हा दम दिलाय.
उल्हासनगरच्या मिराज अशोक अनिल चित्रपटगृहात नुकत्याच रिलीज झालेल्या 'पुष्पा २' चित्रपटाचे दिवसाला १५ शो लावण्यात आले असून द साबरमती फाइल्स या चित्रपटाचा १ शो लावण्यात आला आहे. तर धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाचा मात्र एकही शो या चित्रपटगृहात लावण्यात आलेला नाही.
चित्रपटगृहच्या या कृतीबाबत तक्रारी आल्यानंतर मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख आणि शहराध्यक्ष संजय घुगे यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी थेट या चित्रपटगृहावर धडक देत निदर्शनं केली. "धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चित्रपटाचा शो जर लागला नाही, तर चित्रपटगृहाची एकही काच शिल्लक राहणार नाही आणि चित्रपटगृहात एकही शो होऊ देणार नाही." असा सज्जड दम यावेळी मनसेनं चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना दिला. यानंतर येत्या १ ते २ दिवसात या चित्रपटाचा शो लावण्याचं आश्वासन व्यवस्थापकांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिलंय.
या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर घर केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित केला गेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा चित्रपटातून मांडली आहे. या चित्रपटाची निर्मिती संदीप रघुनाथ मोहिते यांनी केली आहे. तर दिग्दर्शक तुषार विजयराव शेलार यांचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.