Bjp-MNS: बीएमसीसाठी भाजप-मनसे एकत्र? बीएमसी जिंकण्यासाठी भाजपची नवी खेळी

Bjp-MNS: लोकसभेला बिनशर्त पाठींबा देणाऱ्या राज ठाकरेंमुळे विधानसभेला मुंबईत महायुतीला मोठा फटका बसला. त्यामुळे सावध झालेल्या भाजपने नवी रणनीती आखल्याचे संकेत फडणवीसांनी दिलेत. त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट.
Devendra Fadnavis
Bjp-MNSsaam Tv
Published On

राज ठाकरे विधानसभेला महायुतीत सहभागी होण्याची चर्चा रंगली होती. मात्र राज ठाकरेंनी महायुतीत सहभागी न होता राज्यातील 128 जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले. त्यातील एकही उमेदवार विजयी झाला नाही. मात्र त्यानंतरही आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत युती करण्याचे संकेत नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत.तर राज ठाकरेंबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असं शिंदे गटाने स्पष्ट केलंय.

लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठींबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकला चलोची भूमिका घेतली. मात्र त्याचा फटका ठाकरे गटाला बसण्याऐवजी महायुतीलाच बसल्याचं आकडेवारीवरून दिसून येतंय.

मनसेमुळे वाचल्या ठाकरे गटाच्या जागा

शिवडी

अजय चौधरी, ठाकरे गट, 74890 मतं (विजयी)

बाळा नांदगावकर, मनसे, 67750 मतं

विजयी मताधिक्य- 7140

माहीम

महेश सावंत, ठाकरे गट- 50213 मतं (विजयी)

सदा सरवणकर, शिंदे गट- 48897 मतं

मनसेला मिळालेली मतं- 33062 मतं

विजयी मताधिक्य- 1316

वरळी

आदित्य ठाकरे, ठाकरे गट- 63324 मतं (विजयी)

मिलिंद देवरा, शिंदे गट- 54523 मतं

मनसेची मतं- 19367

विजयी मताधिक्य- 8801

दिंडोशी

सुनील प्रभू, ठाकरे गट- 76437 मतं (विजयी)

संजय निरुपम, शिंदे गट- 70255

मनसेची मतं- 20309

विजयी मताधिक्य- 6182

वर्सोवा

हारुण खान, ठाकरे गट- 65396 मतं (विजयी)

भारती लवेकर, भाजप- 63796

मनसेची मतं- 6752

विजयी मताधिक्य- 1600

कलिना

संजय पोतनीस, ठाकरे गट- 59820 मतं (विजयी)

अमरजित सिंह, भाजप- 54812 मतं

मनसेची मतं- 6012

विजयी मताधिक्य- 5008 मतं

Devendra Fadnavis
Ramdas Athawale: शपथविधी कार्यक्रमाला मविआच्या नेत्यांची अनुपस्थिती; केंद्रिय मंत्री म्हणाले, त्यांच्या मनात राग पण..

जोगेश्वरी पूर्व

बाळा नर, ठाकरे गट- 77044 मतं (विजयी)

मनिषा वायकर, शिंदे गट- 75503

मनसेची मतं- 12805

विजयी मताधिक्य- 1541 मतं

विक्रोळी

सुनील राऊत, ठाकरे गट-66093 मतं (विजयी)

सुवर्णा करंजे, शिंदे गट- 50567

मनसेची मतं- 16813

विजयी मताधिक्य- 15526 मतं

Devendra Fadnavis
Sharad Pawar-Devendra Fadnavis: शरद पवारांची EVM वर शंका, देवेंद्र फडणवीसांनी हिशोबच मांडला!

मुंबईत ठाकरे गटाचे 10 आमदार विजयी झालेत. त्यापैकी 7 जागांवर मनसेच्या उमेदवारामुळे ठाकरेंना फायदा झाल्याचं चित्र आहे. त्यामुळेच आगामी मुंबई महापालिका निवडणूकीत मनसेच्या स्वतंत्र लढण्याचा फायदा ठाकरे गटाला होऊ नये, यासाठी फडणवीसांनी राज ठाकरेंसोबत युतीचे संकेत दिलेत.मात्र फोन करूनही शपथविधीकडे पाठ फिरवणारे राज ठाकरे आता फडणवीसांना प्रतिसाद देणार की मराठीच्या मुद्द्यावर रान पेटवणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com