Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीनंतर या ३ राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; देवी लक्ष्मी होणार प्रसन्न

Makar Sankranti : मकर संक्रांती नवीन वर्षाचा पहिला सण येत्या १४ जानेवारी २०२५ ला साजरा केला जाणार आहे. संक्रांतीच्या दिवशी सुर्य मकर राशीत सकाळी ८ वाजून ४४ मिनिटांनी प्रवेश करणार आहे.
Makar Sankranti 2025
Makar Sankrantigoogle
Published On

मकर संक्रांती नवीन वर्षाचा पहिला सण येत्या १४ जानेवारी २०२५ ला साजरा केला जाणार आहे. संक्रांतीच्या दिवशी सुर्य मकर राशीत सकाळी ८ वाजून ४४ मिनिटांनी प्रवेश करणार आहे. संक्रांतीच्या दिवशी खरमास संपतो आणि शुभ कार्याला सुरुवात होते. मकर संक्रांतीला गंगा नदी पृथ्वीवर जन्म घेते असे मानतात. त्यामुळे या दिवशी गंगा नदीत स्नान करणं शुभ मानलं जातं. या दिवशी सकाळी सुर्याला अर्घ्य न चुकता दाखवा.

संक्रांतीला तुम्ही तुमच्या मनातली इच्छा बोलून पाणी, गंगा जल, कच्च दूध, काळे तीळ, लाल चंदन या वस्तू एकत्र करून सुर्य देवाला अर्पण करा. मकर संक्रांतीला या गोष्टी कराच. त्याने तुमच्या आयुष्यात येणारे धन थांबणार नाही. वर्ष सुखाने, आनंदाने जाईल. आता आपण त्या ३ राशींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या आयुष्याचा वाईट काळ आता संपला आहे. आणि मकर संक्रांतीनंतरच्या सणानंतर त्यांच्या आयुष्यात भरभराट होणार आहे. चला तर जाणून घेऊ त्या ३ तीन राशींची नावे. तसेच त्यांच्या आयुष्यात होणारे बदल नेमके कशा पद्धतीचे असतील.

Makar Sankranti 2025
Paush Putrada Ekadashi 2025 : पौष पुत्रदा एकादशीचं व्रत का ठेवलं जातं? जाणून घ्या शुभ वेळ, तारिख, मुहूर्त...

पहिली रास म्हणजे मेष रास. नवीन वर्ष म्हणजे २०२५ चे साल या राशीसाठी कामाच्या दृष्टीने सगळ्यात चांगले जाणार जाणार आहे. तसेच विवाहीत जोडप्यांना हे दिवस चांगले जाणार आहेत. गोड बातमी कानावर येतील. आयुष्यातलं मोठं स्वप्नसुद्धा पुर्ण होऊ शकतो. घरातल्यांसाठी अनेक महत्वाच्या आवश्यक गोष्टींची खरेदी होईल.

दुसरी रास म्हणजे सिंह रास आहे. सिंह राशीच्या लोकांना पैशाच्या अडचणींपासून आता सुटका मिळेल. त्यांच्या मेहनतीतून त्यांना योग्य मोबदला मिळेल. तसेच व्यवसायात प्रगती होईल. अडकलेले व्यवहार मार्गी लागतील.

मकर राशीसाठी २०२५ साल एकदम धमाकेदार ठरणार आहे असं आपण म्हणू शकतो. या राशीच्या आरोग्याच्या समस्या आता सुटणार आहेत. तसेच कामाच्या ठिकाणी मनात असलेली पोस्ट मिळण्याची दाट शक्यता आहे.


Written By : Sakshi Jadhav

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

Makar Sankranti 2025
Period Pain Remedies : मासिक पाळीमध्ये पाणी प्यायल्याने होतील पोटाच्या तीव्र वेदना कमी; जाणून घ्या योग्य पद्धत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com