Year 2025 Rajyog: २०२५ मध्ये ३ राजयोग 'या' राशींना करणार मालामाल, मिळवून देणार छप्परफाड पैसा

Year 2025 Rajyog: पहिला सर्वात मोठा राजयोग जानेवारी महिन्यात आणि दुसरा सर्वात मोठा राजयोग फेब्रुवारी 2025 मध्ये तयार होणार आहे. तिसरा सर्वात मोठा राजयोग म्हणजेच गजकेसरी योग मे महिन्यात तयार होणार आहे.
Year 2025 Rajyog
Year 2025 Rajyogsaam tv
Published On

नवीन वर्ष सुरु झालं असून वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, हे वर्ष खूप खास असणार आहे. पंचांगानुसार, या वर्षात खास ७ राजयोग तयार होणार आहे. त्यापैकी तीन राजयोग खूप शक्तिशाली सिद्ध होणार आहेत. दरम्यान या राजयोगांचा परिणाम प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

पहिला सर्वात मोठा राजयोग जानेवारी महिन्यात आणि दुसरा सर्वात मोठा राजयोग फेब्रुवारी 2025 मध्ये तयार होणार आहे. तिसरा सर्वात मोठा राजयोग म्हणजेच गजकेसरी योग मे महिन्यात तयार होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या तारखेला हे राजयोग तयार होणार असून त्याचा परिणाम कसा दिसून येणार आहे.

Year 2025 Rajyog
Shukra-shani Yuti: 30 वर्षांनंतर शुक्र-शनीची २ वेळा होणार युती; 'या' राशींना लागणार लॉटरी, नोकरीतही होणार फायदा

मालव्य राजयोग

मालव्य राजयोग हा ज्योतिषशास्त्रातील सर्वात शक्तिशाली योग मानण्यात येतो. 2025 मध्ये 28 जानेवारीला हा योग तयार होणार आहे. ज्यावेळी शुक्र वृषभ किंवा तूळ राशीत केंद्रस्थानी असतो, तेव्हा हा राजयोग तयार होतो. या राजयोगामुळे मिथुन, कन्या, वृषभ आणि मीन राशीच्या लोकांचं जीवन बदलणार आहे. या काळात या राशींचे अच्छे दिन येणार आहेत.

Year 2025 Rajyog
Budh Asta: 20 जानेवारीला बुध ग्रह होणार अस्त; 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस

लक्ष्मी नारायण योग

या नवीन वर्ष 2025 मध्ये 27 फेब्रुवारी ते 7 मे या कालावधीत लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. यावेळी कुंडलीमध्ये ज्यावेळी बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह केंद्रस्थानी युती बनवतात किंवा एकमेकांकडे दृष्टी टाकतात तेव्हा लक्ष्मी नारायण योग तयार होतो. या योगामध्ये मिथुन, कन्या, धनु आणि मीन राशीच्या लोकांना वर्षाच्या या काही महिन्यांत पैशाची कमतरता भासणार नाही.

Year 2025 Rajyog
Gajkesari Rajyog: 9 जानेवारीला बनणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु, पद-पैसा मिळणार

गजकेसरी योग

15 मे 2025 रोजी गुरु आणि शुक्र एकत्र आल्यावर गजकेसरी योग तयार होणार आहे. या काळात गुरू मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल घडणार आहेत. मिथुन, कन्या, कुंभ, सिंह आणि मेष या 5 राशींना यातून विशेष लाभ मिळू शकणार आहेत. त्याचप्रमाणे तुमचं आरोग्य सुधारणार असून कुटुंबामध्ये एकोपा राहण्याचे संकेत आहेत.

Year 2025 Rajyog
Shani Ast: तब्बल ४० दिवस शनी राहणार अस्त; 'या' राशींवर ओढावणार संकटं, प्रत्येक कामात येणार अडथळा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com