Shani Ast: तब्बल ४० दिवस शनी राहणार अस्त; 'या' राशींवर ओढावणार संकटं, प्रत्येक कामात येणार अडथळा

Shani Ast 2025: 2025 मध्ये शनि अस्त होणार आहे. जेव्हा एखादा ग्रह अस्त होतो तेव्हा त्याची शक्ती कमी होते. शनीची अस्त म्हणजे तो त्याच्या पूर्ण ताकदीने प्रभाव पाडत नाही.
shani ast for 40 days
shani ast for 40 dayssaam tv
Published On

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, नवग्रहांमध्ये शनी ग्रहाला खास महत्त्व देण्यात आलं आहे. शनि हा कर्माचं फळ देणारा ग्रह मानण्यात येतो. शनि आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माचं फळ देतो. यामुळेच शनिदेवाला कर्मफलाचा स्वामी आणि न्यायाधीश म्हटलं जातं. यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये शनि अस्त होणार आहे. जेव्हा एखादा ग्रह अस्त होतो तेव्हा त्याची शक्ती कमी होते. शनीची अस्त म्हणजे तो त्याच्या पूर्ण ताकदीने प्रभाव पाडत नाही.

प्रत्येक राशीवर शनीच्या अस्ताचा वेगवेगळा प्रभाव पडणार आहे. काही राशीच्या लोकांना यातून आराम मिळू शकणार आहे. तर काहींना यावेळी बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागू शकणार शकतो. या काळात काही राशींच्या आयुष्यात अडचणींचा काळ सुरु होणार आहे. यावेळी कोणत्या राशींच्या मागे साडेसाती लागणार आहे ते पाहूयात.

shani ast for 40 days
Gajkesari Rajyog: 9 जानेवारीला बनणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु, पद-पैसा मिळणार

कधी होणार शनी अस्त?

2025 मध्ये शनिदेव सुमारे 40 दिवस राहणार आहेत. या काळात त्यांची शक्ती कमकुवत होणार आहे. या काळात काही राशींना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. यावेळी नोकरी, आरोग्य आणि आर्थिक बाबतीत नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे.

मेष रास

शनीच्या अस्तामुळे मेष राशीच्या लोकांच्या उत्पन्नात अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. याशिवाय गुंतवणुकीत नुकसान होणार आहे. या काळात तुम्हाला नोकरीत अडचणी येतील. पदोन्नती किंवा नवीन संधी मिळण्यास विलंब होऊ शकतो. आरोग्याच्या समस्याही तुम्हाला सतावतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद आणि मतभेद वाढू शकतात.

shani ast for 40 days
Budh Asta: 20 जानेवारीला बुध ग्रह होणार अस्त; 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस

वृषभ रास

कुंभ राशीत शनीच्या प्रभावामुळे कौटुंबिक कलह वाढू शकणार आहे. घरामध्ये मतभेद आणि अशांतता वाढण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च आणि कर्ज वाढण्याची चिन्हं आहेत. कोणत्याही प्रकल्पात किंवा कामात अचानक व्यत्यय येऊ शकतो. कामात व्यत्यय आल्याने आर्थिक उत्पन्नावर नकारात्मक परिणाम होईल. डोळ्यांशी संबंधित कोणतीही आरोग्य समस्या उद्भवू शकते.

shani ast for 40 days
Shani Surya Yuti: यावर्षी सूर्य-शनीची २ वेळा होणार युती; 'या' राशींच्या आयुष्यात येणार भूकंप, आर्थिक नुकसानही होणार

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांचा मानसिक ताण अधिक असणार आहे. शनीच्या अस्तामुळे मानसिक अस्वस्थता आणि आत्मविश्वास कमी जाणवू शकतो. व्यवसायात नुकसान आणि नोकरीत अनिश्चिततेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला इतर सहकाऱ्यांकडून त्रास होण्याचा धोका आहे.

shani ast for 40 days
Shukra-shani Yuti: 30 वर्षांनंतर शुक्र-शनीची २ वेळा होणार युती; 'या' राशींना लागणार लॉटरी, नोकरीतही होणार फायदा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com