Paush Putrada Ekadashi 2025 : पौष पुत्रदा एकादशीचं व्रत का ठेवलं जातं? जाणून घ्या शुभ वेळ, तारिख, मुहूर्त...

Putrada Ekadashi 2025 : हिंदू धर्मात एकादशीला विशेष व्रत केलं जातं. हे व्रत भगवान विष्णू यांना समर्पित केलं जातं. या दिवशी नारायण आणि लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. एका वर्षात २४ एकादशीचे व्रत केले जातात.
Paush Putrada Ekadashi 2025
Paush Putrada Ekadashi Saam Tv
Published On

हिंदू धर्मात एकादशीला विशेष व्रत केलं जातं. हे व्रत भगवान विष्णू यांना समर्पित केलं जातं. या दिवशी नारायण आणि लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. एका वर्षात २४ एकादशीचे व्रत केले जातात. त्यात जर अधिकमास असेल तर वर्षात एकूण २६ व्रत केले जातात. हिंदू धर्मानुसार हे व्रत पुर्ण केल्याने त्या व्यक्तीला वैकुंठाची प्राप्ती होते. तसेच मनात असणाऱ्या इच्छा पुर्ण होतात. अशी अनेक महत्वाची कामे या दिवशी पुर्ण केली जातात. ती पुढील मुद्यांद्वारे समजून घ्या.

पौष पुत्रदा एकादशी २०२५ कधी साजरी केली जाते?

पौष पुत्रदा एकादशी व्रत मोठ्या संख्येने केले जाते. यंदा हे व्रत १० जानेवारीला असणार आहे. या व्रताची सुरुवात ९ जानेवारीला दुपारी १२.२२ मिनिटांनी सुरू होणार आहे. तर शेवट २० जानेवारीला सकाळी १०.१९ वाजता होणार आहे. यात तिथीनुसार २०२५ मध्ये १० जानेवारी २०२५ला पौष पुत्रदा एकादशी व्रत केले जाणार आहे.

Paush Putrada Ekadashi 2025
Baby Boy Name : भगवान शंकराच्या नावावरून मुलांची ठेवा 'ही' युनिक व अर्थपूर्ण नावं

पौष पुत्रदा एकादशी का साजरी केली जाते?

हिंदू धर्मानुसार वैदिक पंचांग पौष पुत्रदा एकादशीचे व्रत पुत्र प्राप्तीसाठी केलं जातं. त्यात विवाह झालेल्या जोडीला जर मुल होत नसेल तर हे व्रत पाळले जाते. या दिवशी विष्णू देवाची पुजा केल्याने पुत्र प्राप्ती होते. याच दिवशी लक्ष्मी मातेची सुद्धा सेवा केली जाते. हे व्रत केल्याने भगवान विष्णूचा आशिर्वाद मिळतो आणि संतती प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

पौष पुत्रदा एकादशी संबंधित काही महत्वाची माहिती

पौष पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने मुल नसलेल्या जोडप्यांना व नवविवाहीत जोडप्यांना पुत्रप्राप्ती होते. पुत्रदा एकादशी व्रत केल्याने मुलांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. पौष पुत्रदा एकादशीचे व्रत कथा यांचे पठन केल्याशिवाय अपुर्ण मानले जाते. पुत्रदा एकादशीचे दोन प्रकारे व्रत पाळले जाते. १ म्हणजे जलविरहीत आणि २ म्हणजे फळांच्या पदार्थांसह उपवास केला जातो.

Written By : Sakshi Jadhav

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Paush Putrada Ekadashi 2025
Joint Pain Relief : थंडीमध्ये तुमच्याही पायात वारंवार वात येतो? 'या' गोष्टी करा फॉलो, काही दिवसात मिळेल आराम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com