
हिवाळ्यात आरोग्याच्या अनेक समस्यांचा धोका वाढतो. सर्दी-खोकला व्यतिरिक्त, विषाणूजन्य ताप आणि पोटाशी संबंधित समस्या हिवाळ्यात साध्या असतात. या शिवाय या ऋतूत शारीरिक हालचाली कमी होतात, शरीरात जडपणा आणि हातापायात वात, दुखणं ही सामान्य समस्या आहे असं अनेकांना वाटत असतं. असे अनेक लोक आहेत ज्यांना थंडीच्या वातावरणात पाय जड होण्याचा सामना करावा लागतो. पण याचा परिणाम तुमच्या रक्ताभिसरणावर होत असतो.
हाडांच्या समस्या सामान्य वाटत असल्या तरी त्या तशा नसतात. त्यासाठी योगा करणं महत्वाचं असतं. योगा केवळ शरीराला उबदार करत नाही तर स्नायूंना आराम देण्यासाठी देखील उपयुक्त ठरत असतो. हिवाळ्यात योगा केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामुळे शरीराला उष्णता मिळते आणि शारीरिक हालचाली वाढतात, त्यामुळे शरीरात लवचिकता येते आणि थंडीमुळे पाय ताठ होण्यापासून आराम मिळण्यास मदत होते. आता आपण पायातील जडपणा किंवा पायात येणार्या सततच्या गोळ्यांपासून लांब राहण्यासाठी काही योगासने जाणून घेणार आहोत.
मलासनाचे फायदे
मलासनाच्या सरावाने पाय आणि घोट्यातील कडकपणा कमी होतो. मलासन योग केल्याने नितंब आणि कंबरेच्या कडकपणापासून आराम मिळतो. हा योग गर्भधारणेसाठी देखील फायदेशीर आहे. शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी मलासनाचा सराव करता येतो. मलासनाचा सराव करण्यासाठी, स्क्वॅट स्थितीत बसा आणि नमस्कार स्थितीत हात ठेवा.
ताडासनाचे फायदे
ताडासनाच्या सरावाने पायांचे स्नायू ताणले जातात आणि रक्ताभिसरण वाढते. ताडासन केल्याने मांड्या, गुडघे आणि घोटे मजबूत होतात. ताडासन केल्याने शरीराच्या प्रत्येक स्नायूचा उपयोग होतो आणि शरीर ताणले जाते, ज्यामुळे लवचिकता आणि लांबी दोन्ही वाढते. या आसनाचा सराव करण्यासाठी सरळ उभे राहा, हात वर करा आणि टाचांवर उभे राहा. 10-15 सेकंद या स्थितीत रहा.
विरभद्रासनाचे फायदे
या आसनाला योद्धा मुद्रा असेही म्हणतात. या योगामुळे स्नायू मजबूत होण्यास आणि लवचिकता वाढण्यास मदत होते. विरभद्रासन हा नितंब, मांड्या आणि खांद्याच्या स्नायूंना ताणण्यासाठी आणि लवचिकता वाढवण्यासाठी एक प्रभावी योगासन आहे. विरभद्रासनाचा सराव पाय मजबूत करण्यासाठी आणि थंडीमुळे होणारा जडपणा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. हे आसन करण्यासाठी, एक पाय पुढे आणि दुसरा मागे पसरवा. पुढचा गुडघा वाकवून हात वर करा.
Written By : Sakshi Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.