हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. हिवाळ्यात थंड वातावरणामुळे पाणी पिणे बंद करू नका. कारण शरीर हायड्रेट राहणे गरजेचे आहे.
तुम्ही हिवाळ्यात भरपूर फळांचे रस प्या. यामुळे शरीर हायड्रेट होते आणि शरीराला पोषक घटक मिळतात.
हिवाळा म्हटला की, हिरव्या भाजांना बहर येतो. त्यामुळे हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खा. हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, प्रथिने असतात.
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सामान्य तापमानावर असलेले दही, ताक, लस्सी हे पदार्थ खा. यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.
आहारात फळांचे सेवन करणे गरजेचे आहे. मात्र हिवाळ्यात येणारी संत्री जास्त खाऊ नये. आंबट संत्री शरीरात ॲसिडचे प्रमाण वाढवतात.
हिवाळ्यात औषधी वनस्पतीचा काढा आवर्जून प्या. यात दालचिनी, जिरे, हळद यांचा विशेष समावेश करा.
औषधी वनस्पती आणि मसाले यांमधील अँटीऑक्सिडंट, दाहक-विरोधी गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
थंडीत जंक फूड खाणे टाळा. कारण हिवाळ्यात आपली पचनक्रिया मंदावते. त्यामुळे जंक फूडच्या समस्या उद्भवतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.