Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरनं मुंबईत खरेदी केलंय आलिशान अपार्टमेंट, किंमत ऐकून पायाखालची जमीन सरकेल

Shraddha Kapoor Buy New House: श्रद्धा कपूरने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. 'स्त्री' फेम अभिनेत्री श्रद्धा कपूरने मुंबईमध्ये आलिशान घर खरेदी केले आहे. घराची किंमत जाणून घ्या.
Shraddha Kapoor Buy New House
Shraddha KapoorSAAM TV
Published On

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. अलिकडेच श्रद्धा कपूर'स्त्री २' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिचा 'स्त्री २' चित्रपट खूप गाजला आहे. आता अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. श्रद्धाने आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे.

श्रद्धा कपूर आणि तिचे वडील अभिनेता शक्ती कपूर यांनी मुंबईत आलिशान घर खरेदी केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हे अपार्टमेंट तब्बल 6.24 कोटी रुपयांचे आहे. 'ग्लायडर बिल्डकॉन रियल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड' कडून त्यांनी हा फ्लॅट खरेदी केला आहे. कागदपत्रांवरून दिसून आले आहे की, 13 जानेवारी 2025 रोजी मालमत्तेची नोंदणी करण्यात आली आहे. मुंबईत हे आलिशान अपार्टमेंट पिरामल महालक्ष्मी साऊथ टॉवरमध्ये आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, श्रद्धा कपूरचा लग्जरी फ्लॅट 1042.73 चौरस फूट आहे. याला दोन बाल्कनी आहेत. अपार्टमेंटचा प्रति चौरस फूट ₹59,875 रुपयांना आहे. समुद्र किनाऱ्याजवळ 2 किंवा 3 बेडरूमचे अपार्टमेंट आहे. श्रद्धा कपूरने गेल्या वर्षी मुंबईतील जुहू परिसरात 6 लाख रुपये प्रति महिना भाड्याने एक आलिशान अपार्टमेंट घेतले होते.

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा मोठा चाहता वर्ग आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्राम 94.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. आपल्या वेगवेगळ्या लूकचे फोटो आणि फिटनेस व्हिडीओ शेअर करत असते. सध्या श्रद्धा कपूर आपल्या रिलेशनशिपमुळे चांगलीच चर्चेत आहे. श्रद्धाचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Shraddha Kapoor Buy New House
Chhaava Movie Release Date : अखेर ठरलं! 'छावा' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित; विकी कौशल म्हणाला- ३४४ वर्षांनंतर…

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com