Namdeo Dhasal Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dhasal Movie: नामदेव ढसाळांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर, लवकरच भेटीला येतोय 'ढसाळ'

Namdeo Dhasal Biopic: या चित्रपटाच्या निर्मितीचे अधिकार नामदेव ढसाळ यांच्या कुटुंबाकडून अधिकृतपणे घेतले आहेत. दोन वर्षांच्या अत्यंत सखोल संशोधन आणि अभ्यासानंतर हा चित्रपट नामदेव ढसाळ यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी जीवनाचा वेध घेण्यास तयार होत आहे.

Priya More

Upcoming Dhasal Movie:

दलित पँथरचे (Dalit Panther) संस्थापक आणि कवितेच्या माध्यमातून वंचितांवरील अन्यायाविरोधात व्यवस्थेविरोधात एल्गार पुकारणारे नामदेव ढसाळ (Namdeo Dhasal) यांचा जीवन प्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. द बायोस्कोप फिल्म्सने महान बंडखोर कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित 'ढसाळ' (Dhasal Movie) या बायोपिकची घोषणा केली. या चित्रपटाच्या निर्मितीचे अधिकार नामदेव ढसाळ यांच्या कुटुंबाकडून अधिकृतपणे घेतले आहेत. दोन वर्षांच्या अत्यंत सखोल संशोधन आणि अभ्यासानंतर हा चित्रपट नामदेव ढसाळ यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी जीवनाचा वेध घेण्यास तयार होत आहे.

या चित्रपटाची निर्मिती संजय पांडे यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन वरुणा राणा यांनी केले आहे. प्रताप गंगावणे यांनी या चित्रपटाचे संवाद लेखन केले आहे. या चित्रपटामध्ये नामदेव ढसाळ यांच्या अन्याय आणि शोषणाविरुद्धच्या संघर्षाचे वास्तववादी चित्रण करण्यात येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सप्टेंबर २०२४ पासून सुरू होणार आहे. हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Namdeo Dhasal Biopic

निर्माते संजय पांडे यांनी सांगितले की, 'पद्मश्री नामदेव ढसाळ म्हणजे वादळ. अन्याय झालेल्या या दलित समाजाला नवसंजीवनी देणारा, शब्दात विद्रोहाची आग असलेला पँथर, महाराष्ट्राच्या साहित्याला ग्लोबल करणारा पहिला कवी. त्यांचे जीवन चरित्र म्हणजे एक ज्वलंत मशाल आहे. महाराष्ट्रच काय संपूर्ण देशात दलित पँथरने एक राजकीय आणि सामाजिक वादळ तयार केलं होतं. त्यांच्या जीवनावर चित्रपट करणे हे एक निर्माता म्हणून माझं सौभाग्य आहे आणि आव्हान देखील आहे. पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या सर्व देश विदेशातील चाहत्यांसाठी, विद्यार्थी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी ही पर्वणी असेल.'

या चित्रपटाचे दिग्दर्शक वरुणा राणा यांनी सांगितले की, 'काही गोष्टी या सांगायलाच पाहिजे कारण त्या आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात. ढसाळ यांचे जीवन ही अशीच एक कथा आहे. खेडेगावातील महारवाड्यात जन्मलेल्या, मुंबईतील कामाठीपुरा येथे बालपण गेलेल्या ढसाळांनी जागतिक पातळीवर आपल्या कवितेचा ठसा उमटविला. त्यांच्या कट्टर दलित पँथर चळवळ आणि त्यांच्या बंडखोर कवितेतून त्यांनी दलित आणि गरिबांच्या हक्कांसाठी अथक लढा दिला. ढसाळ हे व्यक्तीपेक्षा एक जास्त शक्तिशाली, प्रक्षोभक विचार होता आणि हा विचार मला आव्हानात्मक वाटला म्हणून तो तमाम लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून माझे त्याला प्राधान्य राहील. जातीच्या फिल्टर शिवाय त्यांचे विचार हे सर्व समाजाच्या अंतःकरणाला थेट भिडू शकतात कारण हे विचार कालातीत आहेत.'

नामदेवसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांनी ही यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'आज १५ फेब्रुवारी नामदेवचा जन्मदिवस.. १० वर्षे झाली नामदेव ढसाळ नावाचा झंझावात शांत झाला. नामदेवच समग्र कलंदरपण, विचारीपण, कविमन आणि माणसांप्रती असलेला प्रचंड जिव्हाळा या साऱ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या ढसाळ चित्रपटातून दिसून येईल. या चित्रपटात नामदेवच नाही तर त्याच्या समग्र जीवनाबरोबरच त्यावेळची क्रांतिकारक परिस्थिती, त्यावेळचं राजकारण, पूर्ण दलित पँथरची दहशत असलेली चळवळ असं सर्वांगीण समाजाचाच लेखाजोगा उभा राहील. त्याची बायोपिक हे फक्त वरुणाजींचं स्वप्नच नाही तर हा एक महत्वाचा ऐतिहासिक 'बखरनामाच'आहे. एका महान लोकनायकाच्या जीवनावर चित्रपट बनविण्याच्या वरुणाजींच्या या महत्वाकांक्षेला माझ्या खूप शुभेच्छा आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण कष्टांना व तळमळीला कडक सॅल्युट!'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT