Hi Anokhi Gaath: श्रेयस तळपदेच्या 'ही अनोखी गाठ'मधील पहिलं गाणं रिलीज, 'मी रानभर' तुम्ही पाहिलंत का?

Mi Ranbhar Song: व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर निर्मात्यानी या चित्रपटातील 'मी रानभर' (Mi Ranbhar Song) हे गाणं रिलीज केले आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत असून ते युट्यूबवर धुमाकूळ घालत आहे.
Mi Ranbhar Song
Mi Ranbhar SongSaam Tv

Hi Anokhi Gaath Movie:

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आजारपणातून बरा झाला आहे. सध्या तो त्याच्या अपकमिंग मराठी चित्रपट 'ही अनोखी गाठ'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. श्रेयस तळपदेच्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत असून त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या या चित्रपटाची टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलरनंतर आता पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर निर्मात्यानी या चित्रपटातील 'मी रानभर' (Mi Ranbhar Song) हे गाणं रिलीज केले आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत असून ते युट्यूबवर धुमाकूळ घालत आहे.

झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हिज निर्मित 'ही अनोखी गाठ' या चित्रपटातील पहिले गाणे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रदर्शित झाले. 'मी रानभर' असे बोल असणारे हे गाणे श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. बेला शेंडेने आपल्या मधूर आवाजामध्ये हे गाणं गायलं आहे. तर बेला शेंडेला हितेश मोडक यांचीही या गाण्यासाठी साथ लाभली आहे. हितेश मोडक यांचेच संगीत लाभलेल्या या गाण्याला वैभव जोशी यांचे बोल लाभले आहेत. मुळात गौरी एक उत्कृष्ट नर्तिका असल्याने तिचे बहारदार नृत्य पाहाण्याची संधी प्रेक्षकांना या गाण्यातून मिळणार आहे.

'मी रानभर' या गाण्याबद्दल बोलताना महेश मांजरेकर यांनी सांगितले की, 'प्रेमदिनाच्या निमित्ताने हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. खूप सुंदर, भावपूर्ण बोल आणि संगीत लाभलेल्या या गाण्याला गायकही तितकेच दर्जेदार लाभले आहेत. त्यामुळे या गाण्यात अधिक रंगत येत आहे. नवीन नात्याची सुरूवात या गाण्यातून दिसत आहे. हे नाते कसे बहरतेय, याचे सुंदर चित्रण यातून सादर होत आहे.

Mi Ranbhar Song
Jaya Bachchan Net Worth: 40 कोटींचे दागिने...आलिशान कार...बँकेत १० कोटी; इतक्या कोटींच्या मालकीण आहेत जया बच्चन

'ही अनोखी गाठ' या चित्रपटाच्या माध्यमातून श्रेयस तळपदे आणि आणि महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा महेश मांजरेकर यांचीच आहे. या चित्रपटामध्ये श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर या चित्रपटाचे संवाद गणेश मतकरी यांनी लिहिले आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनामध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे. हा चित्रपट येत्या १ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

Mi Ranbhar Song
Gautami Patil: गौतमी पाटील कधी लग्न करणार?, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दिलं उत्तर...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com