बॉलिवूडच्या (Bollywood) ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) या चर्चेत आल्या आहेत. समाजवादी पक्षाने पुन्हा एकदा जया बच्चन यांना राज्यसभेची (Rajyasabha) उमेदवारी दिली आहे. त्यामुळे जया बच्चन या पाचव्यांदा राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार आहेत. 2004 पासून समाजवादी पक्ष त्यांना राज्यसभेवर पाठवत आहे. जया बच्चन या चार वेळा समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार राहिल्या आहेत. आता त्यांना पाचव्यांना पक्षाकडून राज्यसभेसाठी उमेदवार देण्यात आली आहे.
चित्रपटामध्ये आपल्या दमदार अभिनयानंतर राजकारणात पोहचलेल्या जया बच्चन या सध्या चर्चेत आहेत. यामागचे कारण म्हणजे त्यांनी नुकताच प्रतिज्ञापत्र दाखल केले. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार त्या कोट्यवधीच्या मालकीण आहेत. आज आपण जया बच्चन यांच्या एकूण नेटवर्थविषयी (Jaya Bachchan Net Worth) जाणून घेणार आहोत...
जया बच्चन यांच्याशिवाय समाजवादी पक्षाने रामजी लाल सुमन आणि आलोक रंजन यांना राज्यसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवार म्हणून घोषीत केले आहे. या उमेदवारांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. 75 वर्षीय जया बच्चन यांना पक्षाने सलग पाचव्यांदा राज्यसभेत सपा खासदार म्हणून पुन्हा उमेदवारी दिली आहे. 13 फेब्रुवारीला जया बच्चन यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र दिले. यामध्ये त्यांनी चल- अचल संपत्तीचा उल्लेख केला आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, जया बच्चन आणि त्यांचे पती अमिताभ बच्चन यांची मिळून संपत्ती 1,578 कोटी रुपयांची आहे. प्रतिज्ञापत्रामध्ये 2022-23 या आर्थित वर्षातील दोघांची कमाई नमूद करण्यात आली आहे. या कालावधीमध्ये जया बच्चन यांची कमाई 1,63,56,190 रुपये होती. तर अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती 273,74,96,590 रुपयांची भर पडली आहे.
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, जया बच्चन यांच्याकडे 57 हजार 507 रुपये रोख आणि 10 कोटी 11 लाख 33 हजार 172 रुपये बँक खात्यात जमा आहेत. तर त्यांचे पती अमिताभ बच्चन यांच्याकडे 12 लाख 75 हजार 446 रुपये रोख आणि 1 अब्ज 20 कोटी 45 लाख 62 हजार 83 रुपयांच्या बँक ठेवी आहेत. जया बच्चन यांच्याकडे 40.97 कोटी रुपयांचे दागिने आहेत. तर अमिताभ यांच्याकडे 54.77 कोटी रुपयांचे दागिने आहेत.
जया बच्चन यांच्याकडे 9.82 लाख रुपयांची एक कार आहे. तर अमिताभ बच्चन यांच्याकडे 16 कार आहेत ज्यांची एकूण किंमत 17.66 कोटी रुपये आहे. यामध्ये दोन मर्सिडीज आणि एका रेंज रोव्हरचा समावेश आहे. बच्चन दाम्पत्याने एनएसएस, पोस्टल सेव्हिंग किंवा इन्शुरन्स पॉलिसीमध्ये एकही पैसा गुंतवला नाही. दोघांची 729.77 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे 849.11 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
दरम्यान, समाजवादीचे दुसरे उमेदवार रामजी लाल सुमन हे समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मुलायमसिंह यादव यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांच्याकडे एकूण 1.85 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. 2022-23 साठी तिचे उत्पन्न फक्त 1.20 लाख रुपये होते आणि तिच्याकडे 3 लाख रुपयांचे दागिने आहेत.
तर उत्तर प्रदेशचे माजी मुख्य सचिव आलोक रंजन हे समाजवादी पक्षाने राज्यसभेवर पाठवलेले कदाचित पहिले नोकरशहा आहेत. त्यांचे 2021-22 वार्षिक उत्पन्न 89.24 लाख रुपये होते आणि त्यांची पत्नी सुरभी रंजनसह त्यांची एकूण संपत्ती सुमारे 12.39 कोटी रुपये आहे. ते सेंट स्टीफन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत आणि त्यांनी आयआयएम अहमदाबादमधून एमबीए केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.