Tejaswwini Pandit Wishes Raj Thackeray On His Birthday Instagram
मनोरंजन बातम्या

Tejaswwini Pandit : ‘इतका निस्वार्थी भावना असणारा...’; तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंच्या वाढदिवशी खास पोस्ट

Tejaswwini Pandit Wishes Raj Thackeray On His Birthday : मराठमोळी अभिनेत्री आणि निर्माती तेजस्विनी पंडित हिने खास सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Chetan Bodke

आज (14 जून) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा ५६ वा वाढदिवस. राज ठाकरेंना शुभेच्छा द्यायला आज मनसेचे कार्यकर्ते त्यांच्या 'शिवतिर्थ' या निवासस्थानी गर्दी करत आहेत. अशातच अनेक सेलिब्रिटीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राज ठाकरेंना शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळीनंतर (Prajakta Mali) अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं (Tejaswini Pandit) देखील खास सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तेजस्विनी पंडीतने पोस्टमध्ये लिहिलंय की, “राजसाहेब हेवा वाटतो तुमचा, तुमच्या मराठी आणि महाराष्ट्रवरच्या प्रेमाचा. इतका निस्वार्थी भावना असणारा आणि इतरांसाठी जगणारा माणूस क्वचितच सापडतो आता ! साहेब तुमच्या राजकारणाविषयी, तुम्ही घेतलेल्या भूमिकेंविषयी लोकांचं काय म्हणणं आहे, याच्याशी मला काही घेणंदेणं पण नाही, किंबहुना “तुम्हाला जाणलेल्या” कुठल्याच व्यक्तीच्या मनातलं प्रेम त्यामुळे तसूभरही कमी होऊ शकत नाही, हेच तुम्ही कमावलं आहे. तुम्ही तुमच्या ध्यासाच्या आणि स्वप्नाच्या दिशेने चालत राहा ! आमचा तुम्हाला आणि तुमच्या विचारांना बिनशर्त पाठिंबा आहे. मनासारखा राजा आणि राजासारखं मन ! हसत रहा साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !”

तेजस्विनीची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली असून तेजस्विनीच्या अनेक चाहत्यांनी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत तेजस्विनीने राज ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेले पाहायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती. तेजस्विनीच्या अनेक कार्यक्रमांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VP Election : मोदींचा राहुल गांधींना मोठा झटका, इंडिया आघाडीची १५ मते फुटली, राजधानीत मोठ्या घडामोडी

Success Story: सरकारी नोकरी करत दिली UPSC; पाचव्या प्रयत्नात झाल्या IPS; मोहिता शर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

Pune : पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार, रात्री ११ वाजता मावळ हादरलं, नेमकं काय घडलं?

Chhagan bhujbal : जीआरमध्ये मराठा जातीचा उल्लेख, निर्णय मागे घ्या; छगन भुजबळ आक्रमक

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT