Raj Thackeray News: पाच वर्ष झोपा काढल्या का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले; प्रकरण काय?

Raj Thackeray News: मुंबईतील शिक्षकांना निवडणुकीसाठी काम करण्याचे आदेश देण्यात आल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुका होईपर्यंत शाळाबाह्य काम करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySaam Tv
Published On

गिरीश कांबळे, मुंबई|ता. १९ फेब्रुवारी २०२४

Raj Thackeray Press Conference:

मुंबईतील शिक्षकांना निवडणुकीसाठी काम करण्याचे आदेश देण्यात आल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुका होईपर्यंत शाळाबाह्य काम करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले आहे. या प्रकरणी मुंबईतील काही शाळांच्या शिक्षकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग पाच वर्षे काय काम करतं? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

"माझ्याकडे आता शारदाश्रम महाविद्यालयाचे पालक माझ्याकडे आले होते. त्यांच्या शाळेला नोटीस आली आहे. पहिली ते चौथीच्या शिक्षकांना निवडणूकीचं काम देण्यात आले आहे. किती काळ ड्युटी असेल माहीत नाही,मग शिकवणार कोण? 4 हजार 136 शिक्षकांना निवडणूकांच्या कामांसाठी बाहेर काढण्यात येत आहे. मगं निवडणूक आयोग (Election Commission) पाच वर्षे काय काम करतं?" असा संपप्त सवाल मनसे अध्यक्षांनी यावेळी उपस्थित केला.

"पाच वर्षात ही लोकं तुम्ही का शोधत नाही? जर वेळेत हजर झाले नाही तर शिक्षकांवर हक्कभंग आणणार आहेत. निवडणूक आयोगावर हक्कभंग का आणू नये? पाच वर्षे काय केलं तुम्ही? शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आले आहेत. आमची नेत्यांची बैठक होईल, उद्या परवा आणि निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत. तोपर्यंत कोणत्याही शिक्षकांनी रुजू होऊ नका, शिक्षकांवर कोण हक्कभंग आणतो तेच बघतो आम्ही," असा इशाराही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Raj Thackeray
Political News: भाजपमध्ये इनकमिंग सुरू, लोकसभेपूर्वी विरोक्षी पक्षांना भगदाड पडणार; PM मोदींची ताकद वाढणार!

दरम्यान, शारदाश्रम शाळेच्या विद्यार्थींचे पालक मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. या शाळेतील १२ शिक्षकांपैकी १० शिक्षकांना निवडणूकींची ड्युटी लावली आहे. उरलेल्या २ शिक्षकांपैकी १ शिक्षकांचा अपघात झाला आहे. त्यामुळे ऐन परिक्षेच्या कालावधीत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याच प्रकरणात लक्ष घालण्यासाठी आज मनसे या शिक्षकांनी मनसे अध्यक्षांची भेट घेतली होती. (Latest Marathi News)

Raj Thackeray
Shirpur Crime : एकाच रात्री चार दुकाने फोडली; तरुणाला जग येताच चिल्लर घेऊन चोरटे फरार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com