Shirpur Crime : एकाच रात्री चार दुकाने फोडली; तरुणाला जग येताच चिल्लर घेऊन चोरटे फरार

Shirpur News : थाळनेर पोलिस ठाण्याची व्हॅन घटनास्थळी तातडीने पोचली. त्यांना पाहून चिल्लर जागीच फेकून देत चोरट्यांनी पळ काढला.
Shirpur Crime
Shirpur CrimeSaam tv
Published On

शिरपूर (धुळे) : थाळनेर (ता. शिरपूर) येथील मुख्य बाजारपेठेतील चार दुकाने एकाच रात्री फोडून चोरट्यांनी (Shirpur) रोकड लंपास केली. युवकाला जाग आल्यामुळे आणखी दुकाने फोडण्याचा प्लॅन उधळला जाऊन (Crime News) चोरट्यांनी पलायन केले. (Live Marathi News)

Shirpur Crime
Water Scarcity : ढालेगाव बंधाऱ्यात ६ टक्के पाणी; पाथरी शहरावर पाणी टंचाईचे सावट

शिरपूर तालुक्यातील थाळनेरच्या बाजारपेठेत असलेले मातोश्री मेडिकल व जनरल स्टोअर्स फोडून चोरट्यांनी गल्ल्यातील आठ हजार रुपये चोरले. या दुकानासमोर कैलाससिंह राजपुरोहित यांचे राजस्थानी जोधाना स्वीट्स ॲन्ड नमकीन हे दुकान फोडून तेथील गल्ल्यात ठेवलेले ३३ हजार रुपयेही चोरट्यांनी पळविले. याच परिसरातील कापड दुकान व भांड्यांचे दुकान चोरट्यांनी फोडले. मात्र तेथील गल्ल्यात चिल्लर शिल्लक होती. ती घेऊन चोरटे जात असताना शेजारील घरात झोपलेल्या अमोल निळे याला जाग आली. त्याने पोलिसांच्या १०० क्रमांकावर फोन करून माहिती दिली. थाळनेर (Police) पोलिस ठाण्याची व्हॅन घटनास्थळी तातडीने पोचली. त्यांना पाहून चिल्लर जागीच फेकून देत चोरट्यांनी पळ काढला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shirpur Crime
Sujay Vikhe Patil : बाळासाहेब थोरात भाजपमध्ये येऊ शकतात; सुजय विखे पाटील यांचे सूचक वक्तव्य

चोरटे सीसीटीव्हीत कैद 

मेडिकलचे मालक उमेश सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक निरीक्षक दीपक पावरा तपास करीत आहेत. थाळनेर येथे १८ फेब्रुवारीला मध्यरात्री बाजारपेठेतील मेडिकल, मिठाई, कपडे व भांडे विक्रीची दुकाने कुलूप तोडून चोरट्यांनी फोडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला असून, परिसरात पथके रवाना करण्यात आली. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com