Shirpur Crime : कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; पती झाला फरार

Dhule News : शिरपूर तालुक्यातील फत्तेपूर मांजणीपाडा शिवारातील शेतात मसालीबाई व नंदा पावरा यांचे घर आहे. नंदा पावरा पत्नीशी वारंवार भांडण उकरून काढत तिला व मुलांना ठार करण्याची धमकी देत होता.
Shirpur Crime
Shirpur CrimeSaam tv
Published On

शिरपूर (धुळे) : पत्नीशी भांडण करून संतापाच्या भरात पतीने तिचा खून केल्याची घटना सकऱ्यापाडा (फत्तेपूर फॉरेस्ट, ता. शिरपूर) येथे (Crime News) उघडकीस आली. मसालीबाई नंदा पावरा (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे. (Dhule) सांगवी पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Shirpur Crime
Accident News: शहापूर-सातोना मार्गावर भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू, पती आणि २ मुले गंभीर जखमी, संतप्त जमावाने वाहन पेटविले

शिरपूर (Shirpur) तालुक्यातील फत्तेपूर मांजणीपाडा शिवारातील शेतात मसालीबाई व नंदा पावरा यांचे घर आहे. नंदा पावरा पत्नीशी वारंवार भांडण उकरून काढत तिला व मुलांना ठार करण्याची धमकी देत होता. त्याच्या वागण्याला कंटाळून मुले स्वतंत्र राहत होती. ११ फेब्रुवारीला आईसोबत उशिरापर्यंत गप्पा मारून संजय त्याच्या घरी गेला. दरम्यान १२ फेब्रुवारीला सकाळी आई-वडिलांच्या शेतात जनावरांचा चारा घेण्यासाठी संजय गेला असता त्याला आई अंगणातल्या खाटेवर पांघरूण घेऊन झोपलेली दिसली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shirpur Crime
Jalgaon Accident : मॉर्निंग वॉक गेले असता दुचाकीची मागून धडक; उपचारादरम्यान इसमाचा मृत्यू

मुलाने आईला आवाज देऊनही ती न उठल्याने त्याने पांघरूण बाजूला केले. यावेळी तिचा ओठ मध्यभागी तुटल्याचे व चेहऱ्यावर रक्ताचे डाग आढळले. तो वडिलांना शोधण्यासाठी घरात गेला असता जमिनीवर रक्त दिसून आले. वडील नंदा पावरा यांचा शेतात व घरात पत्ता लागला नाही. नातलग आणि शेजाऱ्यांच्या मदतीने त्याने आईला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीत तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. कौटुंबिक वादातून नंदा पावरा याने पत्नी मसालीबाईचा खून केल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे. (Police) पोलिस निरीक्षक श्रीराम पवार तपास करीत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com