Jalgaon Accident : मॉर्निंग वॉक गेले असता दुचाकीची मागून धडक; उपचारादरम्यान इसमाचा मृत्यू

Jalgaon News : यावल रोडने तापी नदीवरील पुलाकडे जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला मार लागला होता.
Jalgaon Accident
Jalgaon AccidentSaam tv

जळगाव : नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला गेले असता मागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली. यात (Jalgaon) गंभीर झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील विदगाव येथे घडली. (Latest Marathi News)

Jalgaon Accident
Jalna News : जालना तहसील कार्यालयात महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

विदगाव (ता. जळगाव) येथे वास्तव्यास असलेले नरेंद्र पंढरीनाथ कोळी (वय ४४) असे या घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नरेंद्र कोळी हे कंपनीत नोकरीला होते. दरम्यान ३ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले. यावल रोडने तापी नदीवरील पुलाकडे जात (Accident) असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला मार लागला होता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalgaon Accident
Dhangar Reservation : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण हवे; जिल्हाधिकारी कार्यलयावर काढला मोर्चा

कुटुंबाचा आधार गेला 

अपघात घडल्यानंतर गावातील काही नागरिकांनी त्यांना जळगाव येथे उपचारासाठी आणले. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना (Jalgaon Medical Collage) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. मागील दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु असतांना १२ फेब्रुवारीला सकाळी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई अनुसयाबाई, पत्नी शारदा व दोन मुले असा परिवार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com