Maharashtra Politics: मोठी घडामोड! मनसे महायुतीत जाणार? राज ठाकरे- आशिष शेलारांमध्ये तासभर चर्चा; कारण गुलदस्त्यात

MNS Alliance With Mahayuti: गेल्या काही दिवसांपासून मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चाही समोर येत आहेत. अशातच आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गुप्त बैठक झाल्याची बातमी समोर आली आहे.
फडणवीस हे तर पर्शियन
फडणवीस हे तर पर्शियन Saam tv news

Ashish Shelar And Raj Thackeray Meeting:

राजकीय वर्तुळात सध्या लोकसभा निवडणुकांचे (Loksabha Election) वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर युती, आघाड्यांच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होणार असल्याची राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. अशातच आता मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये गुप्त बैठक झाल्याची बातमी समोर आली आहे.

शिवतीर्थ निवासस्थानी १ तास गुप्त बैठक..

आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनसे (MNS) महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चाही समोर येत आहेत. अशातच आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गुप्त बैठक झाल्याची बातमी समोर आली आहे.

आशिष शेलार आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यामध्ये तब्बल १ तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली? बैठकीचे कारण काय होते? याबाबतचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून मनसे नेते आणि भाजप नेत्यांमध्ये वाढलेल्या भेटीगाठी पाहता राज्याच्या राजकारणात नव्या युतीचे संकेत मिळत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फडणवीस हे तर पर्शियन
Mumbai News: धक्कादायक! लिव्ह इन पार्टनरच्या अत्याचाराला कंटाळून तरूणीने संपवलं जीवन

संदिप देशपांडे, राम कदम यांच्या प्रतिक्रिया..

दरम्यान, याबाबत मनसे नेते संदिप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना विचारले असता त्यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले आहे. आमचे सर्व पक्षांशी मैत्रीचे संबंध आहेत, या मैत्रीच्या संबंधांचे राजकीय संबंध निर्माण होणार का? हे सांगणे कठीण आहे, अशी प्रतिक्रिया संदिप देशपांडे यांनी दिली आहे. तसेच महायुतीत कोणी यायचे, कोणाला घ्यायचे याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची मैत्रीचे, कौटुंबिक संबंध आहेत. तशीच भेट होती, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी दिली आहे.

फडणवीस हे तर पर्शियन
Lok Sabha Election: ठाकरे गट १८ जागा लढणार? कोणत्या आणि कुणाला मिळणार संधी?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com