Lok Sabha Election: ठाकरे गट १८ जागा लढणार? कोणत्या आणि कुणाला मिळणार संधी?

Thackeray Group 18 Coordinator: माजी महापौर आणि ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांचेही नाव समन्वयक यादीत आहे. दत्ता दळवी यांच्यावर ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आलीये.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionSaam TV
Published On

गिरीश कांबळे

Shiv Sena Thackeray Group:

राज्यात लवकरच लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागलेत. अशात शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा निवडणूक समन्वयक यादी जाहीर केली आहे. यावेळी अनेक नवख्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीये.

Lok Sabha Election
Loksabha Election In March News | लोकसभा निवडणूक मार्चमध्ये होणार? | Marathi News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्य वक्तव्य केल्याने अटक करण्यात आलेले मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांचेही नाव समन्वयक यादीत आहे. दत्ता दळवी यांच्यावर ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आलीये.

तर आमदार विलास पोतनीस यांच्यावर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. यासह माजी आमदार संजय कदम यांच्यावर रायगड लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आलीये.

लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोर्चेबांधणीला सुरू केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने लोकसभा निवडणूक समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

लोकसभा समन्वयक पुढीलप्रमाणे

  1. जळगाव : सुनील छबुलाल पाटील

  2. बुलढाणा : राहुल चव्हाण

  3. रामटेक : प्रकाश वाघ,

  4. यवतमाळ : वाशीम - उद्धव कदम

  5. हिंगोली : संजय कच्छवे

  6. परभणी : शिवाजी चोथे, संतोष सांबरे

  7. जालना : राजू पाटील

  8. संभाजीनगर : प्रदीपकुमार खोपडे

  9. नाशिक : सुरेश राणे

  10. ठाणे : किशोर पोतदार, सुभाष म्हसकर

  11. मुंबई उत्तर पश्चिम : विलास पोतनीस

  12. मुंबई उत्तर पूर्व ( ईशान्य) : दत्ता दळवी

  13. मुंबई दक्षिण मध्य : रवींद्र मिर्लेकर

  14. मुंबई दक्षिण : सुधीर साळवी, सत्यवान उभे

  15. रायगड : संजय कदम

  16. मावळ : केसरीनाथ पाटील

  17. धाराशीव : स्वप्नील कुंजीर

  18. कोल्हापूर : सुनील वामन पाटील.

Lok Sabha Election
Lok Sabha Election: शिंदे गटातील शिवसेनेच्या तीन जागेवर भाजपचा डोळा; दक्षिण मुंबई, रत्नागिरी, पालघर मतदारसंघ भाजपकडे?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com