लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना मुंबईमध्ये (Mumbai Crime) समोर आली आहे. २४ जानेवारी रोजी ही घटना घडली आहे. २३ जानेवारी रोजी सना आणि भाविक आपल्या मित्र मैत्रिणींना भेटून आले होते. त्यानंतर त्यांच्यात भांडण झालं. त्यानंतर सनाने रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचललं आहे. (Latest Crime News)
तरूणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी लिव्ह इन पार्टनर भाविक शहा (वय ३८) याच्याविरूद्ध समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. सना करमाळी (वय ३६) असं आत्महत्या (Young Woman End Her Life) करणाऱ्या तरूणीचं नाव आहे. लिव्ह इन पार्टनरच्या अत्याचाराला कंटाळून तरूणीने जीवन संपवल्याची घटना घडली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरूणीवर अत्याचार
२४ जानेवारीला सनाने स्वत:ला बेडरूमध्ये कोंडून घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर भाविकने (Live In Partner) वॉचमनला बोलावून दरवाजा तोडला. सना बेशुद्ध अवस्थेत होती. तिला रूग्णालयात नेलं असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
सना जून २०२३ पर्यंत तिच्या आई वडिलांसोबत राहत होती. मागील ३ ते ४ वर्षांपासून ती तणावात असल्याची माहिती मिळतेय. २०२० मध्ये ती फॅशन डिझायनिंगचा कोर्स करत होती. तेव्हा ती भाविकच्या संपर्कात आली. त्यांची मैत्री झाली. सना भाविकच्या प्रेमात पडली. घरच्यांना विरोध असताना ती जून २०२३ पासून भाविकसोबत लिव्ह इनमध्ये (Live In) राहू लागली. ते दोघे कांदिवली परिसरात राहत होते.
अत्याचाराला कंटाळून आत्महत्या
भाविक हा खेळणी विक्रीचा व्यवसाय करायचा. त्याला मधूमेहाचाही त्रास होता. एकत्र राहिल्यानंतर तिला भाविकला दारूचं व्यसन असल्याचं समजलं. तो सनावर शारिरीक अत्याचार देखील करत (crime news) होता. याबाबत तिने तिच्या बहिणीला सांगितलं. बहिणीने तिला घरी परतण्याचा सल्ला दिला होता.
सनाने भाविकला पुन्हा एक संधी देण्याचं ठरवलं. त्यानंतर काही दिवसांतच तिने पु्न्हा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी ती बचावली होती. तेव्हा तिने भाविकच्या अत्याचाराला कंटाळून (Live In Partner Torture) आत्महत्या केल्याचं बहिणीला सांगितलं होतं. कुटुंबियांनी दोघांना समजविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भाविकने सनाचा तिच्या कुटुंबियांसोबतचा संपर्क तोडला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.