Indapur Politics: इंदापुरात पुन्हा पाटील विरुद्ध पवार संघर्ष! लोकसभा निवडणुकीवरून अंकिता पाटलांचा थेट अजित पवारांना इशारा

Ankit Patil Vs Ajit Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक युत्या झाल्यात. मात्र सध्याच्या युतीतही चर्चा होतीय ती म्हणजे पवार विरुद्ध पाटील संघर्षाची.
Ankit Patil Vs Ajit Pawar
Ankit Patil Vs Ajit PawarSaam Tv
Published On

Ankit Patil Vs Ajit Pawar:

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक युत्या झाल्यात. मात्र सध्याच्या युतीतही चर्चा होतीय ती म्हणजे पवार विरुद्ध पाटील संघर्षाची. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातला कट्टर वैरीपणा अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. निवडणुका तोंडावर असतानाच आता हर्षवर्धन पाटलांच्या लेकीनं आणि लेकानं थेट अजित पवारांना चॅलेंज दिल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पाटील यांच्यातला संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

महाराष्ट्राचं राजकारण आणि वजनदार, प्रतिष्ठित घराण्यातला संघर्ष हे जणू काही समीकरणच झालंय. त्यातला त्यात अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील म्हणजे राजकारणातले कट्टर वैरी अशी दोघांची ओळख. दरम्यान या दोघांमधला वाद सुरू झाला तो 90 च्या दशकात. जेव्हा हर्षवर्धन पाटलांचे काका शंकरराव पाटील यांना 1991 मध्ये शरद पवारांनी त्यांचं तिकीट कापून थेट अजित पवार यांना दिलं होतं. तेव्हापासून आजपर्यंत दोन्ही घराण्यात संघर्षाला सुरुवात झालीय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ankit Patil Vs Ajit Pawar
India Alliance: मायावती इंडिया आघाडीत होणार सामील? काँग्रेस नेत्याने केलं मोठं वक्तव्य

अशातच आता काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील यांनी तर अजित पवार यांना थेट ओपन चॅलेंजच देऊन टाकलंय. ''आम्ही पूर्वी आघाडीत होतो आणि आता महायुतीत एकत्र आहोत. मागच्या तिन्ही वेळेस अजित पवार यांनी आम्हाला शब्द देऊन फिरवला आहे. त्यांनी आमची फसवणूक केली आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आमचे जे उमेदवार जाहीर (इंदापूरमध्ये) होतील त्या उमेदवारासाठी ते आमची मदत करणार असतील, विधानसभेला ते आमची मदत करणार असतील तरच आम्ही लोकसभेला त्यांचं काम करू'' असं म्हणत पुणे भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील यांनी इशाराच त्यांनी दिलाय. त्यामुळे महायुतीत सामील झालेल्या अजित पवारांना आता महायुतीतच स्पर्धा करावी लागणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.  (Latest Marathi News)

2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दत्ता भरणे यांनी इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचं पपानिपत केलं होतं. हर्षवर्धन पाटलांच्या पराभवासाठी अजित पवार यांनी इंदापुरात मेहनत घेतली होती. अजित पवारांनीच भरणे यांना जिंकवलं असं स्थानिक राजकारणात बोललं जात. इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसमधून भाजपात आले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असताना अजित पवारांमुळे हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये आले. या दोन्ही नेत्यांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. पण, आता हे वैर पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे.

Ankit Patil Vs Ajit Pawar
Government Schemes : सरकार देत आहे दरमहा 300 युनिट मोफत वीज, कसा करायचा अर्ज? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील यांनी इंदापूरची विधानसभा निवडणूक आम्ही लढवणार आणि जिंकणार असा शड्डू ठोकला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इंदापुरात पाटील विरुद्ध पवार संघर्षाला सुरुवात होऊ शकते. राजवर्धन पाटील यांनी ठणकावून सांगितलं की, काही लोक इंदापूरच्या जागेवरून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, मी पुन्हा एका सर्वांना सांगतो की, आम्ही 2024 ची विधानसभेची निवडणूक लढणार आहोत त्यामुळे आगामी निवडणुकीतली समीकरणं कशी बदलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com