Breaking News: कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाबाबत मोठी अपडेट; मध्य प्रदेशात काँग्रेसला खिंडार पडणार?

Kamalnath Will Not Join BJP: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपमध्ये जाणार, या चर्चांना आता अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपमध्ये जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
MP Former CM
MP Former CMSaam Tv
Published On

Madhya Pradesh Politics News

मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) मोठी बातमी येत आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपमध्ये जाणार नसल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. त्यांचे पुत्र खासदार नकुलनाथ आणि काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याशी चर्चा केल्यानंतर कमलनाथ यांनी पक्षात राहण्याचा निर्णय घेतला आहे. (latest politics news)

प्रदेश काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष जितू पटवारी, माजी मंत्री सज्जन सिंग वर्मा आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. मध्य प्रदेशचे माजी मंत्री सज्जन वर्मा यांनी रविवार १८ फेब्रुवारी रोजी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची नवी दिल्लीत भेट घेतली होती. ही त्यांची बैठक कमलनाथ यांच्या निवासस्थानी अर्धा तास चालली (Politics News) होती. माजी मंत्री सज्जन सिंग वर्मा यांनी माध्यमांशी बोलताना कमलनाथ यांच्याशी काही मुद्यांवर चर्चा झाल्याचं सांगितलं होतं. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही त्यांच्याशी चर्चा केली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कमलनाथ यांचं लक्ष लोकसभेच्या जागांवर

सज्जन सिंग वर्मा माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी 40 वर्षांपासून त्यांच्यासोबत आहे. कमलनाथ जिथे असतील तिथे मी राहीन. कमलनाथ अजूनही काँग्रेसमध्ये आहेत, उद्याही काँग्रेसमध्ये राहतील, पण परवाचं माहित नाही. आमचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी आमचेच आहेत. त्यांच्या विरोधात कोणतीही नाराजी नाही, असं त्यांनी बोलताना सांगितलं (Kamalnath Will Not Join BJP) आहे.

सज्जन सिंग वर्मा म्हणाले की, कमलनाथ यांचं लक्ष लोकसभेच्या 29 जागांवर आहे. ते जातीय समीकरणे निर्माण करत आहेत. तिकीट कोणाला द्यायचे याकडे ते लक्ष देत आहेत. कमलनाथ यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या वृत्ताचे स्पष्ट खंडन केलं आहे. कमलनाथ (Kamalnath) यांनी भाजपमध्ये येण्याबाबत कोणाला सांगितलं आहे, प्रसारमाध्यमांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे, असं म्हणत सज्जन सिंग वर्मा यांनी उलट प्रश्न केला आहे.

MP Former CM
Kamal Nath Joining BJP | MP चे माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपच्या वाटेवर?

अफवांचं खंडन केलं

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी यांनीही कमलनाथ यांच्याबाबत सुरू असलेल्या अफवा फेटाळून लावल्या होत्या. त्यांनी 18 फेब्रुवारीला कमलनाथ कुठेही जात नसल्याचं सांगितलं होतं. काही लोकांनी माध्यमांचा वापर करून या अफवा पसरवल्या आहेत. मी कमलनाथ यांच्याशी बोललो होतो.

प्रसार माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या हे कारस्थानाचा भाग असू शकतं. ही अफवा काही दिवसांपूर्वी पसरली होती. याअगोदर जितू पटवारी यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. ज्या व्यक्तीने पक्ष स्थापनेसाठी मदत (Madhya Pradesh Politics) केली. तो इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा होता, तो पक्ष कसा सोडू शकतो, असं जितू पटवारी यांनी म्हटलं होतं.

MP Former CM
MP News: मध्य प्रदेशाच्या पराभवानंतर काँग्रेस अ‍ॅक्शन मोडमध्ये, कमलनाथ यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com