Pooja Sawant And Siddhesh Chavan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pooja Sawant: 'माझ्यासोबत घडणारी सर्वांत चांगली गोष्ट तू आहेस...', पूजा सावंतने दाखवला होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा

Pooja Sawant And Siddhesh Chavan: पूजाचा होणारा नवरा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूपच उत्सुक होते. अखेर तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख करून दिली आहे.

Priya More

Pooja Sawant Life Partner:

मराठी सिनेसृष्टीची (Marathi Film Industry) प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंतने (Pooja Sawant) नुकताच प्रेमाची कबुली दिली होती. पण पूजाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल काहीच सांगितले नव्हते. तसंच त्याचा चेहरा देखील दाखवला नव्हता.

पण प्रेमाची कबुली दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी पूजा सावंतने आपल्या लाइफपार्टनरचा चेहरा दाखला आहे. पूजाचा होणारा नवरा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूपच उत्सुक होते. अखेर तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख करून दिली आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव सिद्धेश चव्हाण असे आहे. पूजाचा तिचा होणारा नवरा कोण आहे?, तो काय करतो? याबाबत तिने काहिच माहिती दिली नाही.

पूजा सावंतने मंगळवारी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर होणाऱ्या नवऱ्यासोबतचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये पूजा सावंतने एका समुद्र किनारी उभं राहून होणाऱ्या नवऱ्याला मिठी मारल्याचे दिसत होते. या फोटोमध्ये तिचा होणारा नवरा पाठमोरा उभा राहिला असून पूजा कॅमेऱ्याकडे पाहत बोटातील अंगठी दाखवताना दिसली होती. पूजा सावंतने हे फोटो पोस्ट करत We are engaged असे कॅप्शनमध्ये लिहिले होते.

पूजा सावंतने मंगळवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचे तीन फोटो पोस्ट केले होते. पण एकाही फोटोमध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दिसत नव्हता. त्यामुळे पूजाच्या चाहत्यांना तिचा होणारा नवरा कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. अखेर पूजाने आज तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दाखवला आहे. पूजाने सिद्धेश चव्हाणसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

तिने या फोटोंना सुंदर कॅप्शन दिले आहे. तिने असे लिहिले आहे की, 'माझ्यासोबत घडणारी सर्वांत चांगली गोष्ट तू आहेस' पूजाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये हे कपल रोमँटिग अंदाजमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. पूजाने या पोस्टद्वारे फक्त नवऱ्याचे नाव सांगितले आहे पण तो काय करतो याची माहिती अद्याप समोर आली नाही.

पूजा सावंतच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे. त्याचसोबत त्यांनी या पोस्टवर कमेंट्स करत पूजावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पूजा सावंतचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, पूजा सावंत ही मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री आहे.

पूजाने 'क्षणभर विश्रांती' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने 'झकास', 'सतरंगी रे', 'पोस्टर बॉईज', 'दगडी चाळ', 'चीटर', 'भेटली तू पुन्हा' आणि 'लपाछपी' यासारख्या चित्रपटात काम केले. तिचे चित्रपट सुपरहिट ठरले असून प्रेक्षकांना देखील खूप आवडले. तसंच पूजाने 'जंगली' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Natak:'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय'; चंद्रकांत कुलकर्णी लिखित नाटक लवकरच झळकणार मराठी रंगभूमीवर

Maharashtra Live News Update : आमदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबारमधील तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी मिळणार नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरु; शिक्षक भावाच्या आर्थिक नाड्या आवळल्या

Pune News: निलेश गायवळचा जामीन अर्ज रद्द करा, पुणे पोलिसांचा उच्च न्यायालयात अर्ज|VIDEO

SCROLL FOR NEXT