Jasprit Bumrah Instagram Story: हार्दिक पंड्याच्या एन्ट्रीने बुमराह नाराज? इन्स्टाग्राम स्टोरीची जोरदार चर्चा

Jasprit Bumrah News In Marathi: हार्दिक पंड्या मुंबईत आल्याने अनुभवी अष्टपैलू खेळाडूची जागा भरून निघाली आहे. दरम्यान संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे जी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
 jasprit-bumrah-and-hardik-pandya
jasprit-bumrah-and-hardik-pandyainstagram
Published On

Jasprit Bumrah Instagram Story:

आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्स संघात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याचं मुंबई इंडियन्स संघात कमबॅक झालं आहे. गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील १५ कोटींचा ट्रे़ड सक्सेसफुल झाला आहे.

हार्दिक पंड्या मुंबईत आल्याने अनुभवी अष्टपैलू खेळाडूची जागा भरून निघाली आहे. दरम्यान संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे जी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

हार्दिक पंड्याचं मुंबईत कमबॅक..

मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांनी रविवारी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीत हार्दिक पंड्या गुजरातच्या संघात कायम होता. तर काही तासांनी अशी बातमी आली की, गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात ट्रेड झाला असून हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. गुजरात टायटन्स संघाचे डायरेक्टर विक्रम सोलंकी यांनी म्हटलं की, हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्स संघात जायचं होतं. हा त्याचा निर्णय आहे आणि आम्ही त्याचा निर्णयाचा आदर करतो.

जसप्रीत बुमराहची स्टोरी व्हायरल..

जसप्रीत बुमराहने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलं आहे. तर एक लक्षवेधी स्टोरी शेअर केली आहे. त्याने आपल्या स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे.

ज्यावर त्याने 'Silence is sometimes the best answer'(शांत राहणं हे कधीकधी सर्वोत्तम उत्तर असते) असे लिहिले आहे. वर्ल्डकप फायनलनंतर जसप्रीत बुमराहने पहिल्यांदाच पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे काही युजर्सचं म्हणणं आहे की, बुमराह वर्ल्डकपच्या पराभवानंतर निराश झाला आहे.त्यामुळे त्याने ही पोस्ट शेअर केली आहे. (Latest sports updates)

 jasprit-bumrah-and-hardik-pandya
IND vs AUS, Playing XI: ऑस्ट्रेलिया कमबॅक करणार की टीम इंडिया मालिका जिंकणार? पाहा संभाव्य प्लेइंग ११ अन् पिच रिपोर्ट

तर काही युजर्सचं असं म्हणणं आहे की, हार्दिक पंड्या संघात आल्यामुळे त्याने ही पोस्ट शेअर केली आहे. कारण जसप्रीत बुमराह हा संघातील अनुभवी खेळाडू आहे. आगामी आयपीएल २०२४ स्पर्धेत रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करताना दिसून येईल. तर जसप्रीत बुमराह उपकर्णधाराची भूमिका पार पाडताना दिसेल. मात्र आता हार्दिक पंड्याच्या येण्याने जसप्रीत बुमराहच्या उपकर्णधारपदावर गदा येऊ शकते. त्यामुळे जसप्रीत बुमराहने ही पोस्ट शेअर केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 jasprit-bumrah-and-hardik-pandya
IND vs AUS Weather: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-20 होणार रद्द? समोर आलं मोठं कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com