मराठमोळे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याप्रमाणे त्यांची पत्नीही फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मनोरंजन विश्व गाजवले आहे. मुळच्या मुंबईकर असलेल्या निवेदिता सराफ यांचा जन्म ६ जून १९६५ रोजी झाला असून आज त्या आपल्या कुटुंबासोबत ५८ वा वाढदिवस सेलिब्रेट करीत आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाची छाप चित्रपट आणि सीरियलच्या माध्यमातून उमटवली आहे. त्यांनी आपल्या चाहत्यांचे निखळ मनोरंजन केलेले आहे.
निवेदिता सराफ यांनी विविध कार्यक्रम, चित्रपट आणि सीरियलच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन केलेले आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या माध्यमातून निवेदिता यांनी चाहत्यांच्या मनात स्वतःची हक्काची जागा निर्माण केलेली आहे. निवेदिता यांनी आपल्या सिनेकरियरची सुरूवात रंगभूमीवरून केली होती. त्यांचं ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक सर्वत्र गाजलेल्या नाटकांपैकी एक आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून सुरूवात झालेला अभिनयाचा प्रवास आजही अगदी दिमाखात सुरू आहे.
निवेदिता सराफ यांचे ‘वाडा चिरेबंदी’ नाटकाप्रमाणेच ‘कॉटेज नंबर ५४’, ‘टिळक आणि आगरकर’, ‘तुझ्या माझ्यात’, ‘अखेरचा सवाल’, ‘प्रेमाच्या गावा जावे’ हे नाटक देखील विशेष भरपूर गाजले आहेत. निवेदिता सराफ यांना 'अग्गंबाई सासूबाई', 'भाग्य दिले तू मला' या मालिकेंमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये कायमच त्यांच्या साड्यांच्याही जोरदार चर्चा होताना दिसते. त्यांच्या साधेपणाने नेटकऱ्यांचे मन जिंकले.
निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र कामही केले होते. रिल लाईफमध्ये असलेले कपल रियल लाईफमध्येही कपल आहेत. १९९० मध्ये या दोघांनीही लग्नगाठ बांधली. अशोक सराफ निवेदिता यांच्यापेक्षा वयाने तब्बल १८ वर्षांनी मोठ्या आहेत. अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी झालेला आहे. तर निवेदिता सराफ यांचा जन्म ६ जून १९६५ रोजी झालेला आहे. या दोघांमध्ये तब्बल १८ वर्षांचे अंतर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.