Santosh Juvekar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Santosh Juvekar : 'तो मराठाच वाटतो...' संतोष जुवेकरनं केलं विकी कौशलचं कौतुक, पाहा VIDEO

Santosh Juvekar Praised Vicky Kaushal : मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरने 'छावा' सुपरस्टार विकी कौशलचे कौतुक केले. विकीला छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहून त्याला कसे वाटले, जाणून घ्या.

Shreya Maskar

विकी कौशलचा 'छावा' (Chhaava ) चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजनंतर चाहत्यांमध्ये सिनेमा पाहण्यासाठी खूप उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर रायाजींच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. विकी कौशलसोबत 'छावा' चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकणार आहे. विकी कौशल चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे.

अभिनेता संतोष जुवेकरने (Santosh Juvekar) राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत विकी कौशलचे तोंड भरून कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे. विकी कौशलला छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशात आणि भूमिकेत पाहून कसे वाटले? यावर उत्तर देत संतोष जुवेकर म्हणाला, "विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी करेक्ट कास्टिंग आहे. कारण त्याची उंची, त्याचं दिसणं त्याचा रंग या सर्वांमुळे तो मराठाच वाटतो. या ठिकाणी जर दुसरा कोणी गोरागोमटा व्यक्ती असता तर महाराजांसारखा वाटला नसता. माझे राजे...त्याचा तो पूर्ण पेहराव पाहून डोळ्यात पाणी आले."

पुढे संतोष जुवेकर म्हणाला, "विकी मला त्याच्या बाजूला बसायला बोलवायचा तेव्हा असे व्हायचे की, तुम्ही ज्या पोशाखात किंवा भूमिकेत आहात तिथे मी बसू शकत नाही. मला असे व्हायचे की मी मराठी आहे आणि याची मला जाण आहे. मी इतका फोकस व्यक्ती कधी पाहिला नाही. " असे मत संतोष जुवेकरने 'छावा' चित्रपट आणि विकी कौशल बद्दल मांडले.

संतोष जुवेकरला विचारले की, "'छावा'च्या सेटवर जाताना तुझ्या डोक्यात काय विचार असायचे?" यावर उत्तर देत संतोष जुवेकर म्हणाला, "चित्रपटाच्या या मधल्या काळात मी संतोष जुवेकर नव्हतो खरा.. मी पूर्णपणे रायाजी होतो." संतोष जुवेकरने आजवर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्याच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT