Santosh Juvekar: 'आम्ही काय तोडफोड केली आहे...' ; संतोष जुवेकरने 'छावा' चित्रपटाच्या सेटवरील भन्नाट व्हिडिओ केला शेअर

Santosh Juvekar Post For Chhava Movie: मागील काही वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील 'छावा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ संतोष जुवेकरनं शेअर केला आहे.
Santosh Juvekar Post
Santosh Juvekar PostSaam Tv

मागील काही वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील 'छावा' चित्रपट (Chhava Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छावा चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अनेक मराठी कलाकार दिसणार आहे. नुकतंच संतोष जुवेकरने (Santosh Juvekar) चित्रपटाच्या सेवटवरील एक व्हिडिओ शेअर करत त्याचे शुटिंग संपल्याचे सांगितले आहे.

संतोष जुवेकरने विकी कौशलसोबतचा (Vicky Kaushal) एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात विकी कौशल आणि संतोष जुवेकर मज्जा-मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत, 'फायनली माझं shoot संपल. पण शूटिंगचे दिवस आठवणीत राहतील कारण उत्तम कलाकारांची आणि टीमची साथ असेल तर काम बहारदार रंगत आणि मनही कामात रमतं. हया क्लिप मधून तुम्हाला आम्ही सेटवर केलेल्या मस्तीची कल्पना येईल पण मला खात्री आहे सिनेमाचा पहिला trailer येईल तेव्हा आम्ही काम करताना काय तोडफोड मेहनत केलीये याचीसुद्धा कल्पना येईल. आम्ही कलाकार जेव्हा एखादा नवीन काम करतो तेंव्हा नवीन माणसांची नवीन मित्रांची ओळख होते आणि एक नवीन कुटुंब तयार होत असतं.

आमच्या आयुष्यात आणि आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात म्हणून माझ्या या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला माझं खूप खूप प्रेम तुम्ही सगळ्यांनी खूप मोलाची साथ दिलीत. लक्ष्मण उतेकर सरांनू तुम्हला आणि आपल्या direction टीमला आपल्या संपूर्ण @maddockfilms production टीमला, आपले DOP सौरभ sir, बबलू sir, fight director परवेज भाई त्यांची टीम आपले सगळे खाउपियू घालणे डिपार्टमेंट वाले आणि सगळेच तुम्हां सगळ्यांना एक प्यारवाली झप्पी. विकी कौशल पाजी , आशिष सर , अंकित, शुभांकर, बालाजी sir, pradeep sir, तुम्हां सगळ्यांना big love u.आपण सर्वांनी केलेल्या आपल्या मेहनतीला आई भवानीचा , छत्रपती शिवाजी महाराजांचा , छत्रपती संभाजी महाराजांचा आणि मायबाप रसिकांचा आशिर्वाद लाभुदे हीच इच्छा आणि प्रार्थना. चलो भेटूयात लवकरच तोपर्यंत..... जय भवानी' असं कॅप्शन दिले आहे.

Santosh Juvekar Post
Tharla Tar Mag: ऊसाचा रस, पावभाजी अन् रोमँटिक डान्स; सायली- अर्जूनची डेट; मालिकेचा नवीन प्रोमो आला समोर

संतोष जुवेकर अनेक मालिका, चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तो लवकरच छावा चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. छावा चित्रपटाच्या शुटिंगचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Santosh Juvekar Post
Nilesh Sabale: 'म्हणून मी झी मराठी सोडण्याचा निर्णय घेतला...'; निलेश साबळेने सांगितलं 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम बंद होण्यामागचं कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com