Tharla Tar Mag: ऊसाचा रस, पावभाजी अन् रोमँटिक डान्स; सायली- अर्जूनची डेट; मालिकेचा नवीन प्रोमो आला समोर

Tharla Tar Mag Promo: मराठी वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही लोकप्रिय मालिका आहे. मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील सायली- अर्जूनची जोडी चाहत्यांना खूप जास्त आवडत आहे. मालिकेत काही दिवसांपासून सायली- अर्जूनमध्ये प्रेम फुलताना दिसत आहे.
Tharla Tar Mag
Tharla Tar MagSaam Tv

मराठी वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही लोकप्रिय मालिका आहे. मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील सायली- अर्जूनची जोडी चाहत्यांना खूप जास्त आवडत आहे. मालिकेत काही दिवसांपासून सायली- अर्जूनमध्ये प्रेम फुलताना दिसत आहे. मालिकेच्या नवीन भागात सायली अर्जूनला रोमँटिक डेटवर घेऊन जाणार आहे.

ठरलं तर मग मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. मालिकेत सध्या साक्षीचं सत्य सायली अर्जूनला समजले आहे. त्यांनी चैतन्यला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु तो काही ऐकताना दिसत आहे. अर्जूनला या सर्व तणावातून बाहेर काढण्यासाठी सायली त्याला डेटवर घेऊन जाण्याचा प्लान करते.

मालिकेच्या नव्या प्रोमोत सायली अर्जूनला डेटवर घेऊन जाते. ते दोघंही सर्वात आधी ऊसाचा रस पितात. ऊसाच्या रसानंतर ते दोघे पावभाजी खाताना दिसत आहे. यानंतर सायली अर्जुन एका रोमँटिक गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ते दोघेही एकमेकांशी खूप गप्पा मारतानाही दिसत आहे. मालिकेचा हा नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

Tharla Tar Mag
Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीनची लेकसुद्धा बॉलिवूड गाजवणार? वडिलांनी केला स्वतः खुलासा

'ठरलं तर मग' मालिकेच्या कथानकात अनेक नवीन ट्विस्ट येताना दिसत आहे. साक्षी शिर्केचा अर्जूनच्या मित्राच्या आत्महत्येशी संबंध असल्याचे सायली-अर्जूनला समजले आहे. त्यामुळे ते आता सायलीचं खरं रुप सर्वांसमोर आणायला काय करणार? साक्षीचा खरा चेहरा सर्वांसमोर येणार का? तर दुसरीकडे अर्जून सायलीला त्याच्या मनातलं प्रेम सांगणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेले आहेत.

Tharla Tar Mag
Nilesh Sabale: 'म्हणून मी झी मराठी सोडण्याचा निर्णय घेतला...'; निलेश साबळेने सांगितलं 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम बंद होण्यामागचं कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com