Pav Bhaji Recipe : घरच्या घरी बनवा स्ट्रीट स्टाइल चमचमीत पावभाजी; रेसिपी पाहा

Street Style Pav Bhaji Recipe : पावभाजी ही आपण घरच्या घरी बनवू शकतो. पावभाजीची रेसिपी अंत्यत सोपी आणि झटपट होणारी आहे.
Pav Bhaji Recipe
Pav Bhaji RecipeSaam Tv
Published On

How To Make Pav Bhaji :

सर्वांनाच जंक फूड किंवा स्ट्रीट फूड खायला खूप आवडतात. परंतु आरोग्याच्या दृष्टीने अनेक जण स्ट्रीट स्टाइल पदार्थ घरी बनवतात. त्यातीलच एक पदार्थ म्हणजे पाव भाजी. पाव भाजी हा असा पदार्थ आहे जो सर्वांनाच आवडतो.

पावभाजीचं नाव घेताच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. घरात काही कार्यक्रम असेल, कोणाचा बर्थडे असेल किंवा अगदी पूजा देखील असेल तरी लोक पावभाजी करतात. पटकन आणि चविष्ट अशी पावभाजी सर्वजण खातात. पावभाजी ही आपण घरच्या घरी बनवू शकतो. पावभाजीची रेसिपी अंत्यत सोपी आणि झटपट होणारी आहे. आज आम्ही तुम्हाला पावभाजीची रेसिपी सांगणार आहोत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. सामग्री

  • कांदा (Onion)

  • टॉमेटो

  • फ्लॉवर

  • बटाटा (Potatoes)

  • हिरवा वाटाणा

  • शिमला मिरची

  • आलं-लसूण पेस्ट

  • लाल मिरची पावडर

  • पावभाजी मसाला

  • कोथिंबीर

  • तेल (Oil)

  • आवश्यकतेनुसार मीठ

2. कृती

  • सर्वप्रथम शिमला मिरची,टॉमेटो, दोन कांदे, वाटाणे आणि बटाटे स्वच्छ धुवून घ्या.

  • कुकरमध्ये तेल गरम करा. त्यात सर्व भाज्या टाका. थोडा वेळ भाज्या चांगल्या परतून घ्या.

  • त्यानंतर त्यात पाणी घाला. मंद आचोवर कुकरच्या तीन शिट्ट्या होऊ द्या.

  • शिजलेल्या भाज्यांची मिक्सरमध्ये किंवा चमच्याच्या साहाय्याने बारीक पेस्ट करुन घ्या.

  • त्यानंतर कढईत तेल टाका. त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाका.

Pav Bhaji Recipe
Misal Recipe : घरच्या घरी बनवा झणझणीत मिसळ, झटपट अन् स्वादिष्ट रेसिपी पाहा
  • त्यानंतर त्यात पावभाजी मसाला, लाल मिरची पावडर टाका, भाजी लालसर दिसण्यासाठी खाण्याचा रंग घाला.

  • मसाले व्यवस्थित परतून झाल्यावर त्यात पाणी घाला. त्यानंतर भाज्यांची पेस्ट मिक्स करा.

  • तुमच्या अंदाजानुसार त्यात पाणी घाला. पावभाजी जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या.

  • पावभाजीत चवीनुसार मीठ टाका. त्यात वरुन बटर आणि कोथिंबीर घालून पावभाजी खाऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com