Missal Recipe
Missal RecipeSaam Tv

Misal Recipe : घरच्या घरी बनवा झणझणीत मिसळ, झटपट अन् स्वादिष्ट रेसिपी पाहा

Missal Pav Recipe : मिसळ ही अत्यंत साधी सोपी आणि झटपट बनणारा पदार्थ आहे. याच मिसळीची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
Published on

How To Make Misal Pav:

महाराष्ट्राला फार मोठी खाद्यसंस्कृती लाभली आहे. आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या स्टाईलने एकच पदार्थ बनवला जातो. असाच एक झमझणीत, तर्रीदार आणि चटपटीत पदार्थ म्हणजे मिसळ पाव.

महाराष्ट्रात कुठेही जा मिसळपाव हा हमखास मिळतो. नाश्त्यात, जेवणात तुम्ही मिसळ खाऊ शकता. मिसळ ही अत्यंत साधी सोपी आणि झटपट बनणारा पदार्थ आहे. याच मिसळीची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मिसळ बनवू शकता. काही ठिकाणी अनेक कडधान्ये वापरुन मिसळ बनवली जाते. तर काही ठिकाणी मटकीची मिसळ बनवली जाते. पुणेरी मिसळ, कोल्हापूरी मिसळ, नाशिक मिसळ अशा सर्व प्रकारच्या मिसळी महाराष्ट्रात बनवल्या जातात.

1. साहित्य

  • २ कप मोड आलेली मटकी

  • कांदा (Onion)

  • मिसळ मसाला

  • आल लसूण मसाला

  • तीळ

  • जिरे- मोहरी

  • गरम मसाला (दालचिनी, वेलदोडा, बदाम फुल, पत्री पान)

  • लाल मिरची पावडर

  • हळद (Turmeric)

  • मीठ

  • पाणी

  • कोथिंबीर

  • तेल (Oil)

  • फरसाण

Missal Recipe
Bitter Gourd Recipe : कडू कारले खाताना मुले नाक मुरडताय? या टीप्स फॉलो करा, चवीने खातील

2. कृती

  • मिसळ बनवताना सर्वप्रथमम गरम मसाला (दालचिनी, वेलदोडा, बदाम फुल, पत्री पान), तीळ, जिरे कढईत भाजून घ्या.

  • हे मिश्रण गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या.

  • त्यानंतर कढईत खोबरे, कांदा भाजून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये भाजलेले खोबरे, कांदा, आल-लसूण पेस्ट, कोथंबीर बारीक करुन घ्या.

  • त्यानंतर त्यात गरम मसाल्याची पावडर मिक्स करुन घ्या. या मिश्रणात थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या.

  • आता एका मोठ्या पातेल्यात ३ चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यावर जिरं मोहरीची फोडणी द्या.त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्या.

  • त्यानंतर त्यात मोड आलेली मटकी घाला. व्यवस्थित मिक्स करुन घ्या. नंतर त्यात लाल मिरची पावडर, हळद,मिसळ मसाला आणि कांदा लसूणचा मसाला घाला. हे मिश्रण मिक्स करुन घ्या.

  • या मिश्रणात पाणी घाला.त्यानंतर चवीनुसार मीठ घाला. मटकी शिजेपर्यंत मिसळ आटू द्या. यानंतर फरसाण, कांदा आणि कोथिंबीर टाकून तुम्ही पावासोबत मिसळ खाऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com