कारलं म्हटलं की अनेकजण नाक मुरडतात. कारल्याची भाजी खायला टाळाटाळ करतात. प्रत्येकाला ही कडू भाजी खायची नसते. परंतु कारलं हे शरीरासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे अनेक समस्या दूर होतात.
कारलं ही खूप पौष्टिक भाजी आहे. कारलं खालल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच मधुमेहाचे प्रमाण आटोक्यात ठेवण्यात मदत करते. कर्करोगाशी लढा देण्यासाठी कारलं मदत करते. कारलं ही सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे. जर तुमच्या घरी मुलं असतील त्यांना कडू कारल आवडत नसेल तर या टीप्सचा वापर करा.
1.कारल्याची साल काढणे
कारल्याच्या (Karela) सालीवर कडूपणाचे प्रमाण जास्तीत जास्त असते. कडूपणा कमी करण्यासाठी कारल्याची साल काढून घ्या.
2. गूळ वापरा
कारल्याच्या भाजीची चव गूळ (Jaggery) घातल्याने अधिक वाढते. याची चव देखील उत्तम प्रकारे लागते. फक्त गुळाचा तुकडा किसून घ्यावा आणि भाजीमध्ये घाला. त्याने भाजीला गोडसरपणा येईल. त्यामुळे लहान मुले आनंदाने ही भाजी खातील.
3. कारले तळून घ्या
जर तुम्ही पकोडे बनवण्यासाठी कारल्याचा वापर करणार असाल तर कडूपणा दूर होईल. कारल्याला तळल्याने त्यातील कडूपणा निघून जातो.
4. बिया काढून टाकणे
भाजी करण्यापूर्वी कारल्याच्या बिया काढून टाकल्या आहेत याची नेहमी खात्री करा. कारल्याच्या बियांमध्येही कडवटपणा जास्त असतो. तसेच या बिया तुम्ही घरच्या घरी रोप लावण्यासाठी वापरु शकतात.
5. मीठ
कारल कमी कडू करण्यासाठी आणखी एक सोपा मार्ग म्हणजे ते मीठात मॅरीनेट करणे. कारल्याची साल काढून टाका. त्यावर भरपूर प्रमाणात मीठ घाला आणि कारल्याच्या सर्व भागावर चोळा. त्यानंतर त्याला एका वाडग्यात ठेवा आणि 30 मिनिटे बाजूला ठेवा. त्यानंतर त्यांना धुवून घ्या. जेणेकरुन कारल्यातील कडूपणा निघून जाईन.
6. भिजवण्याची पद्धत
एका भांड्यात 1/2 कप पाणी, 1/2 कप व्हिनेगर आणि 2 चमचे साखर घाला. चिरलेले कारल यात भिजवा. त्यांना किमान 20-30 मिनिटे भिजवू द्या. आता पाणी काढून टाका आणि कारले पाण्याने धुवा. त्यानंतर ते स्वयंपाकात (Kitchen) वापरु शकता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.