Dussehra 2023 Special
Dussehra 2023 SpecialSaam Tv

Dasara 2023 Special : दसऱ्याला याप्रकारे बनवा गोडाचा पदार्थ, मलाईदार क्रिमी घट्ट सीताफळची बासुंदी; पाहा रेसिपी

How to Make Sitafal Basundi : यंदाच्या दसऱ्याच्या नैवेद्यासाठी टेस्टी आणि गोडाचा पदार्थ बनवण्याचा विचार करत असाल तर सीताफळची बासुंदी ट्राय करु शकता
Published on

Sitafal Basundi:

सध्या भारतात सणवाराला उत्साहात सुरुवात झाली आहे. त्यामुळे घरात एकदम टेस्टी आणि पंचपक्वानांचे बेत रंगतात. शारदीय नवरात्रीची सांगता ही दसऱ्याने होते. यंदा दसरा हा सण २४ ऑक्टोबरला भारतात साजरा केला जाईल.

प्रत्येक सणाला आपण घरात गोडा-धोडाचे पदार्थ बनवत असतो. जर तुम्ही देखील यंदाच्या दसऱ्याच्या नैवेद्यासाठी टेस्टी आणि गोडाचा पदार्थ बनवण्याचा विचार करत असाल तर सीताफळची बासुंदी ट्राय करु शकता. अगदी सोपी आणि पचायला हलकी अशी सीताफळची बासुंदी कशी बनवायची हे पाहूया ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dussehra 2023 Special
Shivsena Dasara Melava: शिवसेनेच्या इतिहासात शिवतीर्थावरच्या दसरा मेळव्याचा इतिहास काय आहे? वाचा सविस्तर

1. साहित्य | Ingredients

  • सीताफळ बासुंदी | Sitafal Basundi Recipe

  • सीताफळाचा गर २ मोठे | Custard Apple 2 big

  • दूध (Milk) १/२ लिटर | Milk ½ litre

  • साखर (Sugar) १/४ कप | Sugar ¼ cup

  • आखी वेलची २ ते ३ | Cardamom 2 to 3

  • वेलची पूड १/४ छोटा चमचा | Cardamom Powder ¼ tsp

  • केशर ७ ते ८ काड्या | Saffron 7 to 8

2. सजावटी करिता | For Garnishing

  • बारीक चिरलेले पिस्ते | Finely Chopped Pistachios

  • गुलाब पाकळ्या | Rose Petals

  • काजू बदाम (Almond) काप २ चमचे | Finely Chopped Cashew Nuts 2 tsp

Dussehra 2023 Special
Panner Tikka Sandwich : सकाळचा नाश्ता हेल्दी व टेस्टी हवाय ? मग ट्राय करा पनीर टिक्का सॅण्डविच, पाहा रेसिपी

3. कृती

  • पातेल्यात अर्धा लिटर दूध घेऊन त्यात वेलची आणि केशर घालून ढवळून घ्या

  • त्यात साखर आणि काजू बदामाचे काप घालून पुन्हा ढवळून घ्या

  • नंतर त्यात वेलची पूड घालून ढवळून घ्या. तयार दूध थंड होण्यास ठेवा

  • सीताफळचा बिया काढून तयार गर मिक्सरमध्ये वाटून घ्या.

  • तयार गर गाळून घ्या. नंतर थंड झालेल्या केशरी दूधात सीताफळचा गर त्यात घाला.

  • थोडा वेळ थंड झाल्यानंतर बाऊलमध्ये घेऊन सर्व्ह करा. वरुन पिस्त्याचे काप आणि गुलाब पाकळ्या घाला.

Dussehra 2023 Special
Most Dangerous Fort In Pune : डोळ्यांना स्वर्गसुख देणारा पुण्यातील चित्तथरारक किल्ला, निसर्गाचं सौंदर्य पाहून ट्रेकर्सप्रेमींना भूरळ!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com