Breakfast Idea : सकाळचा नाश्ता हा भरपेट करायचा असतो असे आपण अनेकदा ऐकलेच असेल. रात्री झोपल्यानंतर ते सकाळी उठेपर्यंतच्या काळात काही तासांच अंतर असते. त्यासाठी नाश्ता हा हेल्दी व पौष्टिक असायला हवा असे म्हटले जाते.
नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत लोकांना चमचमीत पदार्थ खायला आवडतात. नाश्त्यात हेल्दी आणि चविष्ट पदार्थ मिळत असतील तर ती वेगळीच बाब आहे. पण जर तुम्हाला पोहे, उपमा खाऊन वैताग आला असेल तर नाश्त्यात हेल्दी पण टेस्टी असे सॅण्डवीच ट्राय करु शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सॅण्डविच सगळ्यांना आवडते. आज आम्ही तुम्हाला पनीर टिक्का सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
2. कृती
पनीर टिक्का सॅण्डविच बनवण्यासाठी सर्वप्रथम चीज (Cheese) क्यूब किसून घ्या. यानंतर एका भांड्यात ठेवा.
आता टोमॅटो चांगले धुवून ठेवा. टोमॅटो नीट पुसून त्याचे गोल काप करा.
यानंतर पनीर घेऊन त्याचे पातळ चौकोनी तुकडे करून ठेवा.
यानंतर, तुम्ही ब्रेड स्लाईस घ्या आणि त्यावर बटर, चिली फ्लेक्स आणि पिझ्झा सॉस घाला.
आता ब्रेडच्या स्लाइसच्या वर टोमॅटोचे ४ तुकडे पसरवा. त्याच्या वर पनीरचे 4 तुकडे ठेवा.
यानंतर, किसलेले चीज ब्रेडच्या स्लाइसवर पसरवा. आता ब्रेडच्या स्लाइसवर चिमूटभर मीठ घाला.
यानंतर, तयार सॅण्डविच एका भांड्यात ठेवा आणि मायक्रोवेव्हमध्ये 2 मिनिटे बेक करा.
तयार आहे पनीर टिक्का सॅण्डविच तयार आहे. टोमॅटो सॉससोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.