कोमल दामुद्रे
महिन्याभरापासून टोमॅटोच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.
घाऊक बाजारात आवक कमी होत असल्याने टॉमेटोच्या किरकोळ दराने उच्चांक गाठला आहे.
सध्या टोमॅटोचे दर हे १५०चे आसपास आहेत. त्यामुळे गृहिणीच्या जेवणाची चवच जणू पळाली.
देशातील अन्य राज्यांमध्येही टॉमेटोचे दर कडाडले आहेत. अनेक राज्यांमध्ये टोमॅटो २०० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे.
हिमाचल प्रदेशातही झालेल्या पावसाच्या हाहाकारामुळे टोमॅटोची आयत ठप्प झाली आहे. त्यामुळे भावात वाढल झालेली पाहायला मिळाली.
तसेच महाराष्ट्रातील इतर राज्यात पाऊस हा उशीरा आल्यामुळे हा परिणाम झाला आहे.
उशीरा येणाऱ्या पावसामुळे बाजारात भाजीपाल्यांची आवक घटली
त्यामुळे इतर भाजीपाल्यांसोबतच टोमॅटोच्या दराने उच्चांकी गाठली आहे.
महाराष्ट्रातील काही भागात पाऊस आहे तर काही भागात पुरेसा असा पाऊस नाही. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे.
टोमॅटोच्या वाढत्या भावामुळे स्ट्रीट फूडपासून ते मॅकडोनल्डस् सारख्या कंपन्यानी खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटोचा वापर करणे बंद केला आहे.
पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नाही तर टोमॅटोच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे