Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीनची लेकसुद्धा बॉलिवूड गाजवणार? वडिलांनी केला स्वतः खुलासा

Nawazuddin Siddiqui News: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असतो. नवाजुद्दीन नेहमी वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. नवाजुद्दीनच्या पाऊलावर पाऊल ठेवून लेक शोरा लवकरच इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार असल्याचे बोलले जात आहे.
Nawazuddin Siddiqui News
Nawazuddin Siddiqui NewsSaam Tv

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असतो. नवाजुद्दीन नेहमी वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. नवाजुद्दीनच्या पाऊलावर पाऊल ठेवून लेक शोरा लवकरच इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. शोरा सिद्दिकी ही १३ वर्षांची असून तिला आर्ट, अभिनयाची आवड आहे. ती सध्या अभिनयाचे धडे गिरवत असल्याचे सांगितले जात आहे.

नवाजुद्दीन स्वतः अभिनयाचे वर्कशॉप घेतो. तो कलाकारांना आपल्या तालमीत उत्तमरित्या तयार करतो. त्याची लेक शोरादेखील इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी इच्छुक असल्याचे त्याने सांगितले.

नुकत्याच एका मुलाखतीत नवाजुद्दीनने त्याच्या लेकीच्या करिअरबद्दल सांगितले आहे. मला वाटतं की, 'शोराने तिची स्वप्नं पूर्ण करावीत. ती १३ वर्षांची आहे. तिला आर्ट्समध्ये आपलं करिअर करायचं आहे. मी तिचं अॅक्टिंग स्कूमध्ये अॅडमिशन केलं आहे. जर तिला अॅक्टिंगमध्ये करिअर करायचे असेल तर मला तिला ट्रेन करायला नक्की आवडेल. अॅक्टिंग ही एक कला आहे. त्यामुळे ती पूर्ण तयार होईल. मी तिच्या पाठीशी नेहमी उभा आहे. मी माझे सर्व प्रयत्न करेन. मी तिला सर्वात उत्तम अॅक्टिंग स्कूल आणि वर्कशॉपला घेऊन जाईन. जर तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल असे तर तुम्ही त्यासाठी खूप प्रयत्न करायचे हवे. मेहनतीने आणि मनापासून ती गोष्ट करायला हवी', असे नवाजुद्दीनने सांगितले.

Nawazuddin Siddiqui News
Ranveer Singh Deepfake Video: रणवीर सिंगच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणी मुंबई पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल करत तपास सुरू

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, त्याने अनेक चित्रपटात, वेबसीरीजमध्ये काम केले आहे. तो नेहमी करिअरमध्ये नवीन आव्हाने स्विकारत नव्या भूमिका निवडतो. त्यासाठी त्याचे खूप कौतुक केले जाते. नवाजुद्दीनने 'हड्डी', 'बजरंगी भाईजान', 'गँग ऑफ वासेपूर' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Nawazuddin Siddiqui News
Nilesh Sabale: 'म्हणून मी झी मराठी सोडण्याचा निर्णय घेतला...'; निलेश साबळेने सांगितलं 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम बंद होण्यामागचं कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com