Travel And Tourism Career: हिंडण्या-फिरण्याची आवड आहे? ट्रॅव्हल टुरिझम क्षेत्रात करु शकता करिअर; जाणून घ्या

Tourism Career: अनेकांना फिरण्याची, वेगवेगळ्या ठिकाणी भेट देण्याची, तेथील संस्कृती जाणून घ्यायची आवड असते. परंतु अनेकांना रोज फिरायला भेटत नाही. मात्र, जर तुम्हाला फिरायला आवडत असेल तर तुम्ही या क्षेत्रात आपले करिअर करु शकतात.
Career In Tourism
Career In TourismSaam tv

अनेकांना फिरण्याची, वेगवेगळ्या ठिकाणी भेट देण्याची, तेथील संस्कृती जाणून घ्यायची आवड असते. परंतु अनेकांना रोज फिरायला भेटत नाही. मात्र, जर तुम्हाला फिरायला आवडत असेल तर तुम्ही या क्षेत्रात आपले करिअर करु शकतात. तुम्हाला या क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोणते कोणते पर्याय उपलब्ध आहेत याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

सध्या देशातील अनेक विद्यापीठे, शैक्षणिक संस्था ट्रॅव्हल अँड टुरिझम संदर्भातले पदवी आणि पदव्युतर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. दहावी- बारावी उत्तीर्ण झालेली मुले या क्षेत्रात काम करु शकतात. वेगवेगळ्या ट्रॅव्हल आणि टुरिझमच्या कोर्ससाठी अॅडमिशन घेऊ शकता. (Latest News)

ट्रॅव्हल अँड टुरिझम क्षेत्रात तुम्ही टिकेटींग अँड रिझर्व्हेशन म्हणजे तिकिट काढणे, आरक्षण करणे याचा कोर्स करु शकतात. किंवा टुरिझम अँड गाईडिंग कोर्स करु शकतात. यात तुम्ही पर्यटकांना पर्यटनस्थळांबद्दल माहिती देऊ शकतात, त्यांना गाइड करु शकतात.

Career In Tourism
Power Nap Time : तुम्हालाही दुपारी झोपण्याची सवय आहे? जाणून घ्या आरोग्यासाठी किती फायदेशीर?

ट्रॅव्हल अँड टुरिझमचा तुम्ही व्यवसाय सुरु करु शकतात. तसेच तुम्ही ट्रॅव्हल टुरिझम कंपन्यामध्ये वेगवेगळ्या पोस्टवर काम करु शकतात. जर तुम्हाला एखादी भाषा येत असेल तर तुम्ही ट्रान्सलेटर म्हणून एखाद्या ट्रॅव्हल आणि टुरिझम कंपनीमध्ये काम करु शकतात. तसेच तुम्ही टूर कन्सल्टन्ट म्हणून काम करु शकतात. ज्यात तुम्ही एखाद्य व्यक्तीला त्याची टूर प्लान करायला मदत करु शकतात. प्रत्येक कुटुंबाच्या टूरचे बजेट वेगवेगळे असते. त्यामुळे टूर कन्सलटन्ट म्हणून काम करु शकतात.

Career In Tourism
Watermelon Benefits : उन्हाळ्यात फायदेशीर ठरेल कलिंगड, वजन होईल कमी; पचनक्रियाही सुधारेल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com