Power Nap Time : तुम्हालाही दुपारी झोपण्याची सवय आहे? जाणून घ्या आरोग्यासाठी किती फायदेशीर?

Afternoon Nap Time : आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोप ही अधिक महत्त्वाची आहे. रात्री किमान ८ तासांची झोप घ्यावी असे डॉक्टर आपल्याला नेहमी सांगतात. रात्री ८ तासांची झोप आपली व्यवस्थित झाली की, आपल्याला दिवसभर फ्रेश वाटते.
Power Nap Importance, Afternoon Nap Time
Power Nap Importance, Afternoon Nap TimeSaam Tv
Published On

Day Nap Disadvantage and Advantage :

आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोप ही अधिक महत्त्वाची आहे. रात्री किमान ८ तासांची झोप घ्यावी असे डॉक्टर आपल्याला नेहमी सांगतात. रात्री ८ तासांची झोप आपली व्यवस्थित झाली की, आपल्याला दिवसभर फ्रेश वाटते.

आपल्यापैकी अनेकांना दुपारी झोप येते. त्यासाठी ते दुपारी वामकुक्षी घेतात. अभ्यासातून असे दिसून आले की, दिवसाची लहान झोप मन आणि आरोग्य (Health) निरोगी ठेवण्यास मदत करते.

कमी झोप घेतल्यास लठ्ठपणा तर वाढतोच पण शरीराच्या अनेक प्रकारच्या कार्यात समस्या निर्माण होऊ शकतात. अनेकवेळा असे घडते की आपल्याला रात्री (Night) पुरेशी झोप येत नाही आणि त्याची भरपाई करण्यासाठी आपण दिवसाही झोप घेतो, हे योग्य आहे की नाही. आयुर्वेदानुसार दुपारी झोप घेणे आरोग्यासाठी किती फायदेशीर (Benefits) आहे? कोणत्या लोकांनी झोप घेणे चांगली आहे? जाणून घेऊया.

Power Nap Importance, Afternoon Nap Time
Watermelon Benefits : उन्हाळ्यात फायदेशीर ठरेल कलिंगड, वजन होईल कमी; पचनक्रियाही सुधारेल
  • जे विद्यार्थी सतत अभ्यास करतात. त्यांच्यासाठी दुपारची झोप घेणे चांगले आहे. यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते. तसेच मनाला आणि डोक्याला विश्रांती मिळते.

  • दिवसभरात जर आपण अधिक शारीरिक श्रम केले असतील त्यांनी दुपारी थोडीफार झोप घ्यावी. यामुळे शरीराला आराम मिळतो. शारीरिक थकवा जाणवतो. दिवसा झोप घेतल्याने वात कमी होऊ शकतो.

  • ज्या लोकांची शस्त्रक्रिया झालीये किंवा त्यांना दुखापत झालीये त्यांनी दिवसा झोप घ्यावी. यामुळे वात संतुलित राहते. तसेच जखमांवर आराम मिळतो.

Power Nap Importance, Afternoon Nap Time
Sunstroke Precaution : सावधान! उष्माघात वाढतोय, कशी घ्याल आरोग्याची काळजी?

1. या लोकांनी दिवसा झोपू नका

  • लठ्ठ किंवा जास्त वजन असलेल्यांनी दिवसा झोपू नये.

  • जर तुम्ही दिवसभरात जास्त तेलकट पदार्थ खात असाल तर दिवसा झोपणे टाळा. आयुर्वेदानुसार यामुळे शरीरात कफ वाढतो आणि अपचनाची समस्या होते.

  • खोकला, लठ्ठपणा आणि मधुमेह या आजरांनी त्रस्त असलेल्यांनी दिवसा झोपणे टाळावे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com