Travel Loan : फॉरेनला जाण्याचे स्वप्न होईल पूर्ण, बजेट नसतानाही परदेशी वारी करता येणार; काय आहे ट्रॅव्हल लोन? वाचा सविस्तर

How To Get Travel Loan : आजच्या काळात प्रत्येकाला ट्रॅव्हल करायला खूप आवडते. परंतु आर्थिक अडचणींमुळे अनेकजण परदेशी फिरण्यास जात नाही.
Travel Loan
Travel LoanSaam Tv
Published On

Travel Loan Benefits :

आजच्या काळात प्रत्येकाला ट्रॅव्हल करायला खूप आवडते. परंतु आर्थिक अडचणींमुळे अनेकजण परदेशी फिरण्यास जात नाही. जर तुम्हीही पैशांचा विचार करून परदेशी वारी करू शकत नसाल, तुमची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही ट्रॅव्हल लोन घेऊ शकता. हे कर्ज कसे घेता येईल ते जाणून घेऊया?

तुम्हीही तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत परदेशी जाण्याचा विचार करत आहात. परंतु पैशांच्या कमतरतेमुळे तो प्लान सतत पुढे ढकलला जात असेल, तर आता तुम्ही त्यासाठी ट्रॅव्हल लोन (Loan) घेऊ शकता. हे कर्ज इतर कर्जांसारखे आहे. ज्याप्रमाणे तुम्ही कार किंवा घर खरेदी करण्यासाठी लोन घेता, अगदी त्याच प्रकारे तुम्ही परदेशी जाण्यासाठी ट्रॅव्हल (Travel) लोन घेऊ शकता.

Travel Loan
Home Loan Tips : घराचं कर्ज फेडताना या टिप्स फॉलो करा, लवकर होईल कर्जातून मुक्ती

हे कर्ज घेऊन अनेक लोक प्रवासाची इच्छा पूर्ण करू शकतात . चला, जाणून घेऊया हे कर्ज कसे घेता येईल?

प्रवास कर्ज हे वैयक्तिक कर्जासारखे आहे

आपण वैयक्तिक कर्ज घेतो तसेच समान प्रवास कर्ज असते. हे कर्ज देशांतर्गत फिरण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय (International) सहलींसाठी सहजपणे घेता येते. हे असुरक्षित कर्ज आहे. म्हणजेच या कर्जासाठी तुम्हाला कोणतीही सुरक्षा जमा करावी लागणार नाही. यामध्ये तुम्ही विमान भाडे, प्रवास आणि प्रवासाच्या सामानासाठी कर्ज घेऊ शकता. आजकाल अनेक लोक या ट्रॅव्हल लोनचा फायदा घेत आहेत.

प्रवास कर्ज व्याज दर

देशातील अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना प्रवास कर्जाचा लाभ देतात. खासगी क्षेत्रातील बँका Axis बँकेकडून 15 लाख रुपयांपर्यंतचे प्रवास कर्ज घेऊ शकतात. या कर्जावरील व्याजदर 10.25 टक्के आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी 5 वर्षांपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. हे कर्ज तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने घेऊ शकता.

Travel Loan
Home Loan Benefits For Women : फायद्याचंच! पत्नीच्या नावावर घर घ्या, होम लोनमध्ये मिळेल सूट; कसं ते वाचा

या कर्जाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आयडी प्रूफ, अॅड्रेस प्रूफ, ट्रॅव्हल इन्शुरन्स, बुक केलेली तिकिटे आणि प्रवासाचा तपशील यासारखी अनेक माहिती द्यावी लागेल. तर HDFC बँक 10.50 टक्के व्याजदराने ग्राहकांना 40 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com