तुम्ही होम लोन घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. खरं तर तुम्ही स्वतः ऐवजी तुमच्या पत्नीच्या किंवा आईच्या नावावर घर खरेदी केले पाहिजे. कारण महिलांना होम लोनवर अनेक फायदे मिळतात. महिलांना व्याजदरात सवलत मिळते. त्याचप्रमाणे इतरही काही फायदे सहज उपलब्ध होतात. या फायद्यांबद्दल अधिक जाणून घेऊयात.
व्याजदरात सवलत
बँक आणि नॉन-बँक वित्तीय संस्था (NBFCs) या महिलांना (Women) पुरुषांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज देतात. पुरुषांपेक्षा महिलांना अर्धा ते एक टक्के स्वस्त कर्ज मिळते. तुम्ही तुमच्या पत्नीला सहअर्जदार बनवून स्वस्त दरात कर्ज देखील घेऊ शकता.
कर लाभ देखील उपलब्ध आहेत
महिलांना होम लोनवरील (Home Loan) आयकर कायदा कलम 80C अंतर्गत कर्जाच्या रकमेवरही करावर सूट मिळते. ही सूट 1.50 लाख रुपयांपर्यंत असेल तर कलम 24B अंतर्गत तयार (Ready Condition) घरासाठी होम लोन घेतल्यास त्याच्या व्याजावर 2 लाखांची कर सूट मिळेल.
व्याज अनुदानाचा लाभ
महिला आणि पुरुष (Men) दोघांनाही स्टॅम्पचा लाभ मिळतो. मात्र व्याज अनुदानाचा लाभ महिलांना मिळतो. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 2.67 लाख रुपयांपर्यंत अनुदान महिलांना मिळू शकते. महिलांना सहअर्जदार बनवूनही या योजनेचा लाभ घेता येईल.
सणासुदीच्या काळात ऑफर
सणासुदीचा हंगाम जवळ आला आहे. अशा परिस्थितीत बँका महिलांसाठी खास ऑफर आणू शकतात. त्या सर्व ऑफर्सचा फायदा घेऊन भरपूर बचत करता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.