SIP with Home Loan : घरासाठी कर्ज काढताय? SIPद्वारा होमलोनचा लाभ मिळवा , जाणून घ्या कसे

SIP Power : कर्ज घेऊन घर खरेदी करणे खूप महागडे ठरत आहे. प्रचंड कर्जामुळे लोक आर्थिक बोझ्याखाली दबले जातात.
SIP with Home Loan
SIP with Home LoanSaam Tv
Published On

Home Loan :

कर्ज घेऊन घर खरेदी करणे खूप महागडे ठरत आहे. प्रचंड कर्जामुळे लोक आर्थिक बोझ्याखाली दबले जातात. होमलोनद्वारे घेतलेल्या घराची किंमत जवळपास दुप्पट होते. याची भरपाई कशी करायची याचा विचार कधी तुम्ही करता का? म्हणजेच, तुम्ही पुढील 20 वर्षांसाठी व्याज देता.

तुम्ही ते परत कसे मिळवू शकता? जेणेकरून घराची (Home) किंमत फेडता येईल. हे करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे SIP. म्हणजेच एसआयपीद्वारे तुम्ही सहज होमलोन (Home Loan) मिळवू शकता.

SIP with Home Loan
PPF VS SIP: एसआयपी की पीपीएफ? कोणती गुंतवणूक बनवेल तुम्हाला करोडपती

तुम्ही या सगळ्याचा विचार केला तर, तुमच्या फायद्या एवजी तोटा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे SIP हा चांगला पर्याय आहे. जर तुम्ही 50 लाख रुपयांचे होमलोन घेतले असेल तर तुम्हाला पुढील 20 वर्षांसाठी सुमारे 55 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. एकूण परतफेडीची रक्कम पाहिली तर ती 1 कोटींहून अधिक असेल. तेही जेव्हा व्याजदर परतफेडीच्या संपूर्ण कालावधीत 8.5 टक्के राहतात.

SIP मध्ये गुंतवणूक करून असा करा फायदा

जर तुम्ही 50 लाख रुपयांचे घर घेतले. तुम्ही 80 टक्के म्हणजेच 40 लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास, व्याज भरण्यासाठी मोठी रक्कम खर्च होईल. अशा स्थितीत हे व्याज फेडण्याचा विचार करायला हवा. यासाठी म्युच्युअल फंड एसआयपी हा एक चांगला पर्याय आाहे. तुम्हाला होमलोनच्या EMIवरून SIPमध्ये किती पैसे (Money) भरावे लागतील हे ठरवता येईल.

SIP द्वारे होमलोन मॅनेज करा

एसआयपीद्वारे तुम्ही होमलोनचे व्याज सहज मिळवू शकता. जर तुम्ही 10 वर्षांच्या कालावधीसाठी 12-15 टक्के व्याजदराने दर महिन्याला रु 5000 ची गुंतवणूक सुरू करू शकता. शेवटी तुम्ही 14 लाख रुपयांपर्यंत रक्कम परत मिळवू शकता. हे पैसे तुम्ही होमलोनची परतफेड करण्यासाठी वापरू शकता. अशा प्रकारे तुम्ही एसआयपी रिटर्नचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करू शकता. यामुळे घराचे कर्ज फेडायला मदत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com