Chhaava Trailer: 'मेगा ब्लॉकबस्टर...'; विकी कौशलच्या 'छावा' चित्रपट ट्रेलरवर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या कौतुकाचा वर्षाव

Chhaava Trailer: विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा २०२५ मधील बहुप्रतिक्षित चित्रपट 'छावा' चा ट्रेलर रिलीज झाला असून हा ट्रेलर पाहिल्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया येत आहेत.
Chhaava Trailer celebrity reaction
Chhaava Trailer celebrity reactionGoogle
Published On

Chhaava Trailer: विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत या वर्षीच्या बहुप्रतिक्षित 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये विकी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे आणि रश्मिका महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसत आहे. या ट्रेलरवर चाहत्यांकडून तसेच बॉलिवूड सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच, ट्रेलरमधील कलाकारांच्या लूकचीही बरीच चर्चा होत आहे.

'छावा'च्या ट्रेलरवर सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया

'छावा'च्या ट्रेलरवर बॉलिवूड सेलिब्रिटी प्रेमाचा वर्षाव करत आहेत. क्रिती सॅननने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर ट्रेलर शेअर केला आणि लिहिले, “ मेगा ब्लॉकबस्टर लवकरच येणार आहे... !” लक्ष्मण उतेकर सर!! तसेच सगळ्या कलाकारांना टॅग करत, कृतीने लिहिले, सर्वच सुंदर दिसत आहे. मला रश्मिकाचा मराठी लूक आवडला. शाही आणि पूर्णपणे आश्चर्यकारक. संपूर्ण टीमला शुभेच्छा.” त्याच वेळी, अर्जुन कपूर, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांनीही चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक केले.

Chhaava Trailer celebrity reaction
Akshay Kumar: बॉलिवूडमध्ये 'हा' मोठा बदल घडवून आणणं गरजेचं; त्या मुद्द्यावर स्पष्टचं बोलला अक्षय कुमार

अर्जुन आणि आलिया भट्ट यांनीही केले कौतुक

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरनेही त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर 'छावा'चा ट्रेलर शेअर केला आणि लिहिले, "हा चित्रपट चित्तथरारक दृश्यांसह एका भव्य ऐतिहासिक दृश्याचे आश्वासन देते." १४ फेब्रुवारी रोजी मॅडॉकफिल्म्स यांचा चित्रपटगृहात 'छावा' पाहायला विसरू नका. तर आलिया भट्टने लिहिले की, 'ट्रेलर खरोखरच कमाल आहे. शुभेच्छा.

Chhaava Trailer celebrity reaction
Kapil Sharma: कपिल शर्माच्या डेब्यू चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपट होणार डबल धमाका

'छावा' ची रिलीज तारीख

विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'छावा' हा एक ऐतिहासिक-नाटक चित्रपट आहे. जो छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर, रश्मिका या चित्रपटात संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाईंची भूमिका साकारत आहे. विकी आणि रश्मिका व्यतिरिक्त, चित्रपटात अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता सारखे कलाकार देखील आहेत. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये दाखल होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com